प्रेम प्रकरणातुन गोळीबार झालेल्या मुलीचा मृत्यु तर प्रियकराने केली आत्महत्या
प्रेम प्रकरणातुन गोळीबार झालेल्या मुलीचा मृत्यु तर प्रियकराने केली आत्महत्या
पालघर :पालघर जिल्ह्यातील बोइसर येथे शासकीय टिमा हॉस्पिटल जवळ एका तरुणाने केलेल्या गोळीबारात तरुणीचा मृत्यु झाला असून गोळीबार करण्याऱ्या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
दिनांक 28/09/2022 रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास बोईसर येथील टिमा हॉस्पिटल जवळ प्रेमप्रकरणातुन कृष्णा सत्यदेव यादव रा. कोलवडे या तरुणाने नेहा दिनेश महतो रा. सरावली ( वय 21वर्ष ) या तरुणीची गावठी पिस्टलातून डोक्यात गोळी झाडत हत्या केली त्यानंतर गोळी मारुन पळून जात असताना डी डेकोर कंपनी समोर आरोपीने सीआयएसएफ च्या वाहनाखाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला यामध्ये आरोपी कृष्णा यादव हा जख्मी झाला होता याची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेत टिमा हॉस्पिटल मध्ये दाखल केले मात्र उपचारा दरम्यान त्याचा ही मृत्यु झाला आहे.
पोलीस सदर घटनेचा पुढील तपास करत आहे.
Comments
Post a Comment