गुजरात ATS आणि DRI ची मोठी कारवाई, 200 करोड कीमतीची 40 किलो ड्रग्ज जप्त
गुजरात ATS आणि DRI ची मोठी कारवाई, 200 करोड कीमतीची 40 किलो ड्रग्ज जप्त
कोलकाता : गुजरात एटीएस आणि डीआरआय ने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. गुजरात oएटीएस आणि डीआरआयने कोलकाता येथे केलेल्या कारावाईत तब्बल २०० कोटीचे ड्रग्ज जप्त केले आहे. स्क्रॅप बॉक्समध्ये ४० किलो ड्रग्ज दुबई येथून भारतात आणले जात असल्याची माहिती गुजरात एटीएस ला मिळाली होती. या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या 9 महिन्यांत गुजरात एटीएसने केवळ गुजरातमध्येच नव्हे तर इतर राज्यांमध्येही छापे टाकून सुमारे 6500 कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले आहेत.गुजरात एटीएसला दुबईतून ड्रग्ज स्क्रैप च्या कंटेनरमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. ही औषधे 12 गिअर बॉक्समध्ये लपवून ठेवली होती. एटीएसने छापा टाकून गिअर बॉक्स मधून सुमारे 40 किलो ड्रग्ज जप्त केले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 200 कोटी रुपये आहे
Comments
Post a Comment