जन्मदात्या आईनेच केली तीन वर्षीय मुलीची हत्या

 जन्मदात्या आईनेच केली तीन वर्षीय मुलीची हत्या


पालघर :पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील साना सुलेमान या तीन वर्षीय चिमुकलीचा मृतदेह तिच्याच घराशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लास्टिकच्या पिशवीत टाकण्यात आला होता . यानंतर एकच खळबळ उडाली आहे . पोलिसांनी या हत्तेचे गूढ उकलले असून आईनेच आपल्या पोटच्या मुलीचा खून केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी  अफसाना उर्फ तारा सुलेमानी असे आरोपी आईचे नाव असून तिला अटक करण्यात आली आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार अफसाना ही मागील दोन वर्षांपासून तिच्या पतीपासून वेगळी राहत होती. तिला एकूण तीन मुल असून ज्यात दोन मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे. या महिलेला १४ आणि १२ वर्षांची दोन मुले आहेत तर तीन वर्षांच्या चिमुकलीची तिने हत्या केली. ती इतरांच्या घरी काम करून उदरनिर्वाह करत होती. मात्र, तरी सुद्धा तिला पैशांची चणचण भासत होती. यामुळे घरात नेहमीच पैशांवरुन वाद होत होते. यातूनच तिने तिच्या तीन वर्षीय चिमुकल्या सानाची हत्या केली. आणि तिचा मृतदेह हा प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून तो कचऱ्याच्या ढीगाऱ्यात फेकला.

यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास केला. दरम्यान सनाच्या आईवर संशय बळावला. पोलिसांनी तिला अटक करून तिची चौकशी केली असता तिने मुलीचा खून केल्याची कबुली दिली आहे. यात सुलेमानी हिला जव्हार पोलिसांनी कलम 302 आणि 201 अंतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे .

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी