फार्मा कंपनीतील विषारी वायुमुळे एकाचा मृत्यु, तर तीन जण जख्मी.

 फार्मा कंपनीतील विषारी वायुमुळे एकाचा मृत्यु, तर तीन जण जख्मी. 



पालघर -  पालघर जिल्ह्यातील तारापूर बोईसर औद्योगिक क्षेत्रात (एमआयडीसी) फार्मा कंपनीत गॅसमुळे 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. कंपनीचे नाव आरे ड्रग्स फार्मा लिमिटेड आहे, जी API (Active Pharmaceutical Ingredients) आणि केमिकल सॉल्व्हेंट्स बनवते. या कंपनीत आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भागवत चौपाल या 22 वर्षीय कर्मचाऱ्याचा गॅसमुळे मृत्यू झाला. भागवत कुमार चौपाल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भागवत चौपाल यांचा आज सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास टोल्युइन गॅसमुळे मृत्यू झाला. मृत हा भागवत चौपाल ठेकेदार परी एंटरप्रायझेसचा कर्मचारी होता.

  कंपनी मृत भागवत चौपालच्या नातेवाईकांना 6 लाख रुपये देऊन प्रकरण झाकण्याचा प्रयत्न करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी गेटवर कर्मचाऱ्यांच्या आगमनाचे रजिस्टर ठेवत नाही. जे नियमांचे घोर उल्लंघन आहे. आज सकाळी या कंपनीत एकूण 4 जणांना गॅस लागला , त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. यात भागवत चौपाल या कर्मचाऱ्याला गॅस लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. या कंपनीकडून बरंच काही लपवलं जात असल्याची दाट भीती व्यक्त केली जात आहे, ज्याची चौकशी होण्याची गरज आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी