नमो नमो मोर्चा भारतच्या पालघर जिल्हा युनिटची बैठक संपन्न
नमो नमो मोर्चा भारतच्या पालघर जिल्हा युनिटची बैठक संपन्न
नविन पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय अध्यक्ष सत्यप्रकाश सिंह यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले
पालघर..!नमो नमो मोर्चा भारतच्या पालघर जिल्हा युनिटच्या वतीने नमो नमो मोर्चा भारताच्ये राष्ट्रीय अध्यक्ष सत्य प्रकाश सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्ह्यातील सर्व घटकांची बैठक पालघर जिल्हा बोईसर अंतर्गत धोडी़ पुजा येथील संघटना जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीत संघटनेच्या कार्याची प्रसिद्धी करण्याबरोबरच नमो नमो मोर्चा भारताशी नवीन लोकांना कसे जोडता येईल आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले नमो नमो मोर्चा भारताच्या राष्ट्रीय अध्यक्ष सत्यप्रकाश सिंह यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी कुंदन सिंग व बोईसर शहर युवक अध्यक्ष चिन्मय संखे यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी नमो नमो मोर्चा भारताचे राष्ट्रीय मंत्री आर.बी.सिंग, महाराष्ट्र राज्य संयोजिका पायल जैन, पालघर जिल्हा संघटन महामंत्री अखिलेश (सुभाष) पांडे, जिल्हा युवा अध्यक्ष अखिलेश चौबे, जिल्हा युवा प्रभारी अनिश सिंह, जिल्हा युवा विधि सलाहकार सौरभ पांडे,आणि मोर्चाचा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment