कोफेक्स नावाचे औषध विकणारे चार आरोपी तलासरी पोलीसांच्या ताब्यात
कोफेक्स नावाचे औषध विकणारे चार आरोपी तलासरी पोलीसांच्या ताब्यात
पालघर : पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे कोफेक्स नावाचे औषध विक्री करणाऱ्या चार आरोपीना तलासरी पोलीसानी अटक करण्यात आले आहे. यामध्ये एकूण 1050 प्लास्टिकच्या बाटल्या ज्यांची बाजारात किंमत 1,41,750/- रूपये आहे.
बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांना कोफेक्स नावाचे प्रिक्रिप्शनविना औषध गूंगीकारक द्रव अंमली पदार्थ अनधिकृतपणे बेकायदेशिररित्या विक्रीसाठी वाहतुक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे अजय वसावे, प्रभारी अधिकारी तलासरी पोलीस ठाणे यांना नाकाबंदी करुन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
त्या अनुषगाने अजय वसावे व त्यांच्या स्टाफने मुंबई अहमदाबाद महामार्गावरील आर.टी.ओ चेकपोस्ट दापचरी येथे नाकाबंदी सुरु करुन संशयित वाहनाची तपासणी सुरु करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान मारुती सुझुकी कंपनीची एटीगा कार क्र- एम.एच 48/बी. एच /9668 यामध्ये 1,41,750/- रूपये कीमतीचा कोफेक्स नावाचे औषधी गूंगीकारक द्रव अंमली पदार्थाच्या एकूण 1050 प्लास्टिक बाटल्या त्यावर इग्रजीत medimix life sciences pvt. LTD- cofex cough syrup chlor oheni rameign maieat phosphate syrup 100ml असे लिहलेल्या वर्णनाचे त्यांची प्रत्येकी किंमत 135 रूपये लिहले होते.
याबाबत चार आरोपीना अटक करून त्यांच्यावर तलासरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं 319/2022 एन.डी.पि.एस कलम 8 (ब ) ,22(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर तपास हा सपोनि / अमोल गवळी नेमणुक तलासरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांचे आदेशान्वये प्रशांत परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग, अतिरिक्त कार्यभार डहाणु विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अजय वसावे, प्रभारी अधिकारी तलासरी पोलीस ठाणे, सपोनि - अमोल गवळी, भरत पाटील, पोउपनि - अनिल धांगडा व तलासरी पोलीस ठाणे चे अंमलदार यांनी यशश्वीरित्या पार पाडली.
Comments
Post a Comment