बोईसर तारापुर रोडवर भीषण अपघात
बोईसर तारापुर रोडवर भीषण अपघात
पालघर :जिल्ह्यातील बोईसर तारापुर रस्त्यावरील पास्थल गावा जवळील राजपूत मॉल समोर एस. टी बस व दुचाकीस्वार भीषण अपघात झाल्याची दूदैवी घटना समोर आली आहे.
दिनांक 07/09/2022 रोजी रात्री 8 वाजता एस.टी बस व दुचाकी स्वारच्या अपघातात रमेश चौहान वय वर्ष 40 या दुचाकी स्वारचा मृत्यु झाला.मिळालेल्या माहिती नुसार दुचाकीस्वार मोकाट गायी (जनावर ) यांना चूकविण्याच्या नादात बसला धडक देऊन बसच्या खाली आला यात रमेश चौहान गंभीर जख़्मी झाले त्यांना वाहक यांनी बोईसर येथील शिंदे हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले परंतु गंभीर जख्मी झाल्या असल्या कारणाने पुढील उपचारा साठी त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले मात्र मुंबई ला उपचारासाठी जात असताना विरार जवळ मृत्यु झाला.
Comments
Post a Comment