बोईसर मध्ये चाकूने हल्ला करणारे 3 आरोपी पोलीसांच्या ताब्यात
बोईसर मध्ये चाकूने हल्ला करणारे 3 आरोपी पोलीसांच्या ताब्यात
पालघर :पालघर जिल्ह्यातील बोईसर शहरातील आझाद नगर परिसरात गेल्या आठवड्यात किरकोळ वादातून काही मुलांनी दीपक यादव आणि त्याच्या भावावर चाकूने हल्ला केला . या हल्ल्यात दीपक यादव गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे यात सदर प्रकरणी 3 जणाना अटक करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक यादव (21 वर्षे) हा तरुण गेल्या आठवड्यात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास भावासोबत दुचाकीने घरी येत होता. त्याच्या घराजवळ काही स्थानिक मुलांशी किरकोळ वाद झाला. त्यावर त्यांनी दीपक यादव आणि त्याच्या मोठ्या भावावर चाकूने वार केला,आवाज ऐकून दीपक यादवचे वडील शिवशंकर यादव मध्यस्थी करण्यासाठी गेले, तेव्हा त्या मुलांनी त्याच्यावरही चाकूने वार केले.
या हल्ल्यात तरुण दीपक यादव, त्याचा भाऊ आणि वडील शिव शंकर यादव जखमी झाले असून, यामध्ये दीपक यादव यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले.व यात सदर प्रकरणाचे तीन आरोपी पोलिसाच्या ताब्यात असून सदर घटनेची चौकशी एएसपी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नित्यानंद झा (आयपीएस) तपास करत आहेत.
Comments
Post a Comment