टेंभी गावात उपसभापती मिलिंद वडे यांच्या हस्ते विकासकामाचे उद्घाटन
टेंभी गावात उपसभापती मिलिंद वडे यांच्या हस्ते विकासकामाचे उद्घाटन बोईसर : टेंभी गावात प्रेम नगर रस्त्याचे भूमिपूजन व पाणी शुद्धीकरण यंत्र बसवण्याचे 28 फेब्रुवारी बुधवार रोजी पंचायत समिति पालघर उपसभापती मिलिंद वडे यांच्या हस्ते नारळ फोडून विकासकामाचे उद्घाटन करण्यात आले. पालघर तालुक्यातील टेंभी गावात १५ वित्त आयोग फंडातुन पंचायत समिती पालघर चे उपसभापती मिलिंद वडे यांच्या विशेष प्रयत्नातून टेंभी गावातील प्रेम नगर या रस्त्याचे भूमिपूजन व ग्रामपंचायत कार्यालयाकडे पाणी शुद्धीकरण यंत्र बसवण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात टेंभी गावचे सरपंच सरोज वडे , उपसरपंच रूपाली संखे , सदस्य रोहित वडे, संजय वडे, निकिता वडे, जागृती पाटील तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.