प्रशासनाची नियमावली धुडकावून अधिकारी देतोय कारखान्यांना टॅंकरने पाणी
प्रशासनाची नियमावली धुडकावून अधिकारी देतोय कारखान्यांना टॅंकरने पाणी
जय बजाज पेपर (अपोलो ) कारखान्याला प्रशासनाचा नाही धाक
औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक डि -०३ मे. जय बजाज पेपर एन्ड बोर्ड मील्स (अपोलो ) कारखान्यात इमारतीचे बांधकाम सुरू असून अधिकारी प्रोजेक्ट कंपनीकडून सदर बांधकामासाठी मोटार टॅंकर क्रमांक एम एच ०४ सी यू १८४४ या वाहनातून अतिरिक्त बेकायदेशीर पाणी पुरवठा केला जात असल्याचे दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी दोन ते सव्वा दोन वाजेच्या सुमारास निदर्शनास आले आहे.
सदर कारखानदारांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून तशी कुठलीच परवानगी ( कसेंट ) घेतलेली दिसून येत नसून सन २०१६ साली घेतलेली कसेंटची मदत सन २०२१ रोजी संपुष्टात आलेली आहे.
दरम्यान सदर प्रकरणाची गांभीर्याता लक्षात घेता औद्योगिक विकास महामंडळाकडून संबंधित विभागाला पत्रव्यवहार केलेला असून संबंधित विभाग याप्रकरणी नेमकी कुठली भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment