बोईसर पोलिसांची उत्तम कामगिरी : मोबाईल चोरांना केले गजाआड
बोईसर पोलिसांची उत्तम कामगिरी : मोबाईल चोरांना केले गजाआड
बोईसर :- बोईसर शहरातील एकाच्या हातातुन रस्त्यावरुन जात असताना जबरदस्तीने हिसका मारून मोबाईल चोरणाऱ्या दोघांना बोईसर पोलिसांनी अटक केली आहे.
गोविंद चौहाण वय वर्ष २० हा तरुण दिनांक ९ जानेवारी रोजी सायंकाळी सात साडे सात वाजे च्या सुमारास खैरा फाटक पुलाजवळून जात असताना मागून मोटार सायकल वरून दोन इसमांनी येत गोविंद चौहाण यांच्या हातातील वन प्लस कंपनीचा मोबाईल जबरदस्ती ने हातातून खेचत पसार झाले होते.
घटनेची गंभीर दखल घेत बोईसर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत आरोपी दिनेश कुमार चौहाण, आणि सोनू चौधरी यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सदर ची कारवाई बोईसर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान चौधरी करीत आहेत.
Comments
Post a Comment