वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न...
वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न...
बोईसर | पाम गावात दिनांक १६ फेब्रुवारी रोजी पाम कुंभवली विभाग हायस्कुल, पाम -टेभी या विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन शाळेच्या मैदानावर पार पडला. आपल्या आकर्षक प्रस्तुति करणासाठी प्रसिद्ध असलेल्या या संमेलनाने रसिकांचे मन जिंकून घेतले विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर करून आपले कलागुण व कौशल्य सर्वासमोर सादर केले.
या कार्यक्रमाला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त बोईसर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या अध्यक्षतेखाली श्रमप्रतिष्ठान संस्था संचलित पाम कुंभवली विभाग हायस्कूल, पाम-टेंभी येथे लेझीम, बँड व शिस्तबद्ध संचलनाच्या तालात अगदी दिमाखदार व मंत्रमुग्ध करणारा सोहळा संपन्न करण्यात आला.
यावेळी सदर कार्यक्रमात सुमिटुमो कंपनीचे मिलिंद पाटील (एच.आर मॅनेजर) व राजेंद्र घरत( मेंटेनन्स मॅनेजर), जिंदाल स्टील वर्क्स कंपनीचे अमोल सूर्यवंशी (CSR हेड) व राहुल पांडे (welfare Officer) तसेच विशेष अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ता व वसई जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विनोद पिंपळे, संस्था अध्यक्ष प्रदीप पिंपळे यांचे सुपुत्र व संस्थेचे कार्यवाह विनय पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मुख्याध्यापक रामकृष्ण पाटील, संस्थेचे सचिव समीर पिंपळे यांच्या सर्वांच्या सहकार्याने संपन्न करण्यात आला.
पाहुण्यांच्या यथोचित स्वागत व सन्मानासह त्यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच विनोद पिंपळे यांचे गेल्या अनेक वर्षाची परंपरा असलेले पारितोषिक वितरण, मल्लखांबाचे डोळे दिपवून टाकणारे प्रात्यक्षिक व शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध कलाविष्काराचे उत्तम व नाविन्यपूर्ण प्रदर्शन यासह कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन संखे यांनी केले. एकूणच हा दीर्घकाळ स्मरणात राहिल असाच हा स्नेहसंमेलन दिवसाचा रंगतदार कार्यक्रम होता.
Comments
Post a Comment