कंत्राटी कामगारांच्या पगाराला ठेकेदारच लावताहेत चुना...
कंत्राटी कामगारांच्या पगाराला ठेकेदारच लावताहेत चुना...
बोईसर : तारापुर औद्योगिक क्षेत्रामधील कारखानदार व ठेकेदार यांच्या संगनमताने गेली अनेक वर्षे कामगारांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे.किमान वेतन कायदा तर सोडाच परंतु कामगारने केलेल्या कष्टाच्या पैशांवर ठेकेदार गबर होताना दिसून येत आहेत.
अश्याच बोईसर शहरालगतच असलेल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक डि -०६ निर्वाण सिल्क मिल्स प्रा लि या कारखान्यात ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या शिवेश ठाकूर याचा वेतन ठेकेदार संजय सिंह यांनी थकवल्यामुळे कामगार शिवेश सिंह निराश झाला आहे.औद्योगिक क्षेत्रात कामगारांचे वेतन थकवण्याचे प्रकार सुरू असून एखाद्या कामगारांने तकादा लावला तरच त्याला वेतन मिळते नाहीतर गोरगरीब अशिक्षित कामगारांची चांगलीच आर्थिक पिळवणूक या मुजोर ठेकेदारांकडून केली जाते आणि या आर्थिक पिळवणूकीत कंपनी प्रशासन देखील सहभागी असतात .
त्यापैकी एक कामगार यांनी कंपनी प्रशासन व ठेकेदाराच्या धमकीला न घाबरता कामगार उपायुक्त पालघर येथे लेखी तक्रार दाखल केलेली असून कामगार उपायुक्त दहिफळकर लवकरच त्याबाबत न्याय निवाडा करतील असे आश्वसित असलेला कामगार शिवेश ठाकूर यांनी सांगितले आहे.
निर्वाण सिल्क मिल्स प्रा लि या कारखान्यात गेल्या सहा महिन्यांपासून काम करणाऱ्या शिवेश ठाकूर यांनी काही कारणास्तव काम न करण्याचे निर्णय घेतल्यानंतर ठेकेदार संजय सिंह यांनी माहे डिसेंबर महिन्याचा वेतन अडवून ठेवून वेतन मागणी करणाऱ्या कामगार शिवेश ठाकूर याला मारहाण करत पुन्हा वेतन मागितल्यास जीवेठार मारण्याची धमकी देत असल्याचे ठाकूर यांनी सांगितले आहे.
Comments
Post a Comment