ओसीनिक लॅबोरेटरीज कारखान्याचा रसायनयुक्त घनकचरा दहिसर गावात

ओसीनिक लॅबोरेटरीज कारखान्याचा रसायनयुक्त घनकचरा दहिसर गावात


बोईसर : तारापुर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्याचा रसायनयुक्त घनकचरा दहिसर गावातील शेतात आढळून आल्याने खळबळ माजली आहे. औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्याचा रसायनयुक्त घनकचरा  निर्जन स्थळी बेकायदेशीर विल्हेवाट लावण्याच काम हे भरपूर वर्षापासून सुरु असुन केमिकल माफिया व कारखान्यावर ठोस कारवाई होत नसल्यामुळे असे प्रकार वारंवार होताना दिसून येत आहेत.

तारापुर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्याचा रसायनयुक्त घनकचरा विल्हेवाट लावणारी गावगुंड टोळकी दिवसगणीक अधिकच सक्रिय होत चाललेली असून कोलवडे, कुंभवली, पाम, टेंभी, नवापूर, पास्थळ, सालवड, सरावली खैरापाडा या भागात बोंबाबोंब झाल्यामुळे आता या माफियांनी थेट हरित पट्टा रसायनयुक्त पट्टा करण्यासाठी कंबर कसली आहे. शासन प्रशासनाचा या माफियांवर वचक नसल्यामुळे आणि कमी अवधीत झटपट श्रीमंत होण्याच्या नादात हे माफिया आपल्याच आईच्या भूगर्भात रसायनयुक्त घनकचरा टाकण्याचा देशद्रोही कृत्य करत आहेत.


पालघर तालुक्यातील तारापूर पोलीस ठाणे अंतर्गत दहिसर तर्फे तारापूर या गावात दिनांक २० फेब्रुवारी रोजी रसायनयुक्त टाकाऊ घनकचरा आढळून आल्याची खबर उपप्रादेशिक अधिकारी तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळ २ यांना मिळाल्यानंतर उपप्रादेशिक अधिकारी विरेंद्र सिंग व झोनल अधिकारी गजानन पवार यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सदर घटनेचा पंचनामा करून घटनास्थळी आढळून आलेला रसायनयुक्त टाकाऊ घनकचरा मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या ठिकाणी पाठविण्यात आला असल्याचे विरेंद्र सिंग यांनी सांगितले.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक एल -९१ ओसीनिक लॅबोरेटरीज प्रा. लि या कारखान्याचा हा रसायनयुक्त टाकाऊ घनकचरा असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. या पूर्वी देखील याच कारखान्याचा घनकचरा अवधनगर येथिल काही माफियांकडे आढळून आला होता परंतु या माफियाराज विरोधात प्रशासनाकडे कारवाई करण्यासाठी काही ठोस उपाययोजना नसल्यामुळे आजही माफियाराज जोमात आहेत.


◾सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सदर आढळून आलेला रसायनयुक्त टाकाऊ घनकचरा मुंबई वेस्ट मॅनेजमेंट येथे पाठविण्यात आलेला असून ओसीनिक लॅबोरेटरीज प्रा.लि या कारखान्याच्या हा रसायनयुक्त टाकाऊ घनकचरा असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. पुढील कार्यवाही करता वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर केला जाईल. 


विरेंद्र सिंग - उपप्रादेशिक अधिकारी म प्र नि म तारापूर २

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी