सगिता कारखान्याचा रासायनिक द्रव्य वाहतूक करणारा मोटार टॅंकर बोईसर पोलिसांच्या ताब्यात !
सगिता कारखान्याचा रासायनिक द्रव्य वाहतूक करणारा मोटार टॅंकर बोईसर पोलिसांच्या ताब्यात !
बोईसर : दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास सगिता प्रा. लि प्लॉट न. एन 4 या कारखान्याचा एम एच ४३ वाय १८०८ या क्रमांकाचा मोटार टॅंकर बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतलेला असून मोटार टॅंकरमधे रासायनिक द्रव्य भरलेला आहे.
औद्योगिक क्षेत्रात सायंकाळी सहा ते सकाळी सहा या काळात कुठलाही मोटार ट्रक किंवा मोटार टॅंकरला फिरण्यास बंदी असताना देखील रात्रीचा अंधाराचा फायदा घेत घातक रासायनिक द्रव्याची विल्हेवाट निर्जनस्थळी कशी लावता येईल या संधीचा फायदा केमिकल माफिया घेत असून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली कारखानदार दाखवत आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक एन ०४ मेसर्स सगिता प्रा लि या कारखान्याचा रासायनिक द्रव्य भरण्यासाठी पहाटे तीन वाजता मोटार टॅंकर कारखान्याचा आत घेतलेला असून जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार आदेश देऊन देखील मुजोर कारखानदार या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. रात्री उशिरापर्यंत घातक रासायनिक द्रव्य भरून निर्जनस्थळी मोटार टॅंकर उभा करून घातक रासायनिक द्रव्याची विल्हेवाट लावणारी टोळी मोठ्या प्रमाणावर कार्यरत असून सगिता प्रा लि या कारखान्याचा देखील रासायनिक द्रव्य निर्जनस्थळी विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जात असल्याचे सुत्रांकडून समजते.
दरम्यान मोटार टॅंकरमधील रासायनिक द्रव्याचे नमूने गोळा करण्यासाठी पोलिसांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला लेखी पत्र दिलेले असून अहवाल हाती येताच बोईसर पोलिस व प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमकी कुठली कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या कारखानदारावर देखील नेमकी कुठली कारवाई केली जाणार आहे का ? जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश फक्त एक दिखावा तर नाही ना असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित केला जात आहे.
Comments
Post a Comment