मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उपसभापती मिलिंद वडे यांनी केले आयोजन

मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उपसभापती मिलिंद वडे यांनी केले आयोजन


बोईसर : मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन पालघर पंचायत समिती आणि लूपिन ह्युमन वेल्फेअर अँन्ड रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्तमाने उपसभापती मिलिंद वडे, पंचायत समिती पालघर यांनी ग्रामपंचायत कार्यालय हॉल, नवापुर येथे आयोजन केले होते.

पालघर जिल्ह्यातील नवापुर गावात दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 ते 1 वाजे पर्यत ग्रामपंचायत कार्यालय हॉल, नवापुर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोफत आरोग्य शिबिर तपासणीला नवापुर ग्रामस्थानी अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असुन बऱ्याच लोकांनी याचा लाभ घेतला सदर शिबिरात तज्ञ डॉक्टरान द्वारे

मधुमेह, दमा, फुफ्फुसाचे आजार, उच्च रक्तदाब, हदयरोग सबंधी तपासण्या केल्या. त्याच सोबत रुग्णांनी X-Ray, ECG   टेस्ट करून शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करण्यासोबतच त्यांना आजारावर मोफत औषधेही देण्यात आली.



या मोफत आरोग्य तपासणी शिबीरात नवापूर गावाच्या सरपंच अंजली बारी, उपसरपंच खगेश पागधरे, सदस्य आशिष पागधरे, विजय पागधरे, राकेश पागधरे सोबत मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

मुंबई-पालघर सागरी महामार्गाला मंजुरी! प्रवास होणार वेगवान