भरदिवसा घरफोडी करण्याऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

भरदिवसा घरफोडी करण्याऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात


बोईसर : दिनांक ७ फेब्रुवारी रोजी बोईसर शहरातील सरावली येथील शादावल इंप्रेशन येथे सेफ्टी दरवाजाचे लॅचलॉक तोडून त्याआतील लाकड़ी दरवाजाची कड़ी कापून बेडरुममध्ये ठेवलेल्या लाकडी कपाटातील दागीने व रोख रक्कम असा एकूण २,१२,०००/- रू. किमतीचा माल घरफोडी करुन चोरी केल्या प्रकरणी बोईसर पोलीस ठाणे भा.दं.वि. सं. कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, अनिल विभूते, पोलीस निरीक्षक,

स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना तपास पथक तयार करून योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे अनिल विभूते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी 

पोउपनि गणपत सुळे व त्यांच्या टीम ने पथक तयार करुन तांत्रीक व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने आरोपीना बोईसर येथुन ताब्यात घेतले १) मोहमद शकीब मोहमद अंसारी (23 वर्ष ) २) मोहमद उमर महेफूज अहमद (20 वर्ष ) ३) फर्मान अहमद मुज्जमील अहमद (४१ वर्षे ) ४) मोहमद दानिश मोहमद वरीश मलीक (२४ वर्ष) हे सर्व आरोपी उत्तर प्रदेश राज्याचे असुन त्यांचे कडून चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याचे कबुल केले. सदरचा गुन्हा करण्यासाठी सप्टेबंर २०१३ मध्ये मालवीय नगर साउथ दिल्ली येथुन चोरी केलेल्या ब्रीजा मारुती कंपनीच्या कारचा वापर चोरी करता करत असुन त्याप्रकरणी मालवीय नगर येथे गुन्हा दाखल आहे त्याचबरोबर उत्तर प्रदेश ते मुंबई असा प्रवास करून पालघर जिल्यातील बोईसर पोलीस ठाणे व पालघर पोलीस ठाणे येथे दिवसा घरफोड्या केलेल्या आहेत.


सदर आरोपीनकडून बोईसर पोलीस ठाणे भा दं.चि. मं.कलम ४५४, ३८० मधील मालातील सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेले वाहन तसेच दिवसा घरफोडी करण्यासाठी वापरलेले हत्यार व महाराष्ट्रातील बनावट नंबर प्लेट असा एकूण ७,१५,०००/- रूपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन बोईसर, पालघर, मालवीय नगर साऊथ दिल्ली येथील ही गुन्हे आरोपीनकडून उघडकीस करण्यात आलेले आहेत. सदर गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस उपनिरीक्षक विट्ठल मनिकेरी, नेम, बोईसर पोलीस ठाणे हे करीत आहेत.


सदरची कारवाई  बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/अनिल विभुते, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, पोउपनि/गणपत सुळे, पोहवा/१११६ संतोष निकोळे, पोहवा /२०१ दिलीप जनाठे, पोहवा/४४४ विजय ठाकुर, पोना/कल्याण केंगार, पोशि/वैभव जामदार, पोशि/प्रशांत निकम सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, तसेच सायबर पोलीस ठाणे, पालघर येथील स्टाफ यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी