वाढवण बंदर विरोधात चाराेटीत रास्ता राेकाे आंदोलन
वाढवण बंदर विरोधात चाराेटीत रास्ता राेकाे आंदोलन
पालघर : पालघर जिल्ह्यातील हाेऊ घातलेल्या वाढवण बंदर विरोधात आज (गुरुवार) वाढवण बंदर संघर्ष समितीने डहाणूतील चारोटी येथे वाढवण बंदर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता राेकाे केला आहे. यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांशी वाढवण बंदराच्या सर्व मान्यता प्राप्त झाल्या असून याच महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमिपूजन होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.त्यानंतर वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समिती , महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, नॅशनल फिश वर्क फोरम, ठाणे जिल्हा मध्यवर्ती समाज संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, समुद्र बचाव मंच, समुद्रकन्या मंच सातपाटी, कष्टकरी संघटना, भूमी सेना व आदिवासी एकता परिषद व इतर समस्त बंदर विरोधी संघटना यांनी या बंदराला तीव्र विरोध दर्शवला आहे.
चारोटी येथे आंदाेलकांनी रास्ता राेकाे केला. या आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये 55 अधिकारी आणि 780 पोलीस असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यामध्ये पाच आरसीएफच्या तुकड्या दोन एसआरपीच्या तुकड्यांचा समावेश आहे.
Comments
Post a Comment