बोईसर मधील ओस्तवाल संकुलातील सत्यम इमारतीचे रंगकाम करताना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी...
बोईसर मधील ओस्तवाल संकुलातील सत्यम इमारतीचे रंगकाम करताना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी...
बोईसर | पालघर तालुक्यातील बोईसर येथील सुप्रसिध्द असलेल्या ओस्तवाल संकुलातील सत्यम इमारतीचे बांधकामावर रंगकाम करताना अचानक मोठ्या विद्युत लाईनचा शिडीत वीज प्रवाह उतरल्याने दोघांना शॉक लागून एकाचा मृत्यू तर दूसरा गंभीर जख्मी झाला आहे दिनांक १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटाच्या दरम्यान ही घटना घडली असुन या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
बोईसर परिसरातील ओस्तवाल संकुलातील सत्यम अपार्टमेंट सोसायटीकडून रंगकाम करण्यासाठी ठेकेदार नितेश तांडेल नामक व्यक्तींला ठेका देण्यात आले होते. त्या ठिकाणी रंगकाम करणारे कामगार संदेश मऱ्या गोवारी व उत्तम सातवी या दोघांना शिडी सरकवताना तोल जाऊन विद्युत प्रवाहाच्या संपर्कात येऊन जोरदार करंट लागल्याने दोघेही जमिनीवर कोसळले. जबर बसलेल्या करंटमुळे संदेश गोवरी याचा तुंगा इस्पितळात दाखल करण्यापूर्वीच प्राणज्योत मावळली असून उत्तम सातवीची प्रकृती स्थिर असल्याचे साईलिला इस्पितळाचे डॉक्टर जितेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.
सदर प्रकरणाची बोईसर पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे
◾दरम्यान सदर रंगकाम करतेवेळी ठेकेदार, सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांनी कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कुठलीही उपाययोजना न केल्यामुळे हि दुर्घटना घडल्याचे मयत व्यक्तीचे भाऊ महेश मऱ्या गोवारी यांनी सांगितले आहे
Comments
Post a Comment