Posts

Showing posts from January, 2025

ब्ल्यू डायमंड हॉटेल वाल्याने अडवला मुख्य रस्ता ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

Image
ब्ल्यू डायमंड हॉटेल वाल्याने अडवला मुख्य रस्ता ; ग्रामपंचायतीचे  दुर्लक्ष बोईसर : बोईसर नवापूर रोड वरील मुख्य रस्त्यालगत ब्लू डायमंड हॉटेल असून या ठिकाणी मुख्य रस्त्यावर लोखंडी पाईप टाकून लोखंडी साखळी लावून रस्ता अडवणूक केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते व पदपथावर चालणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे परंतू ग्रामपंचायत कारवाई करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेत असल्यामुळें नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्राकडे तसेच आजुबाजुच्या इतर गावाकडे जाण्यासाठी बोईसर वरून नवापूर रोड हा मुख्य रस्ता असून याच नवापूर रोडवरील मुख्य रस्त्यालगत असलेल्या ब्ल्यू डायमंड हॉटेल वाल्यांनी भर रस्त्यावर लोखंडी पाईप व चेन साखळी लावल्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता अधिक अरुंद झाला आहे. त्यामुळे रस्त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या वाहांनाची व पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. ग्रामपंचायत या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करत आहे. हॉटेल वाल्याने लोखंडी पाईप व चेन रस्त्यावर मांडून वाहतूक कोंडी करू नये, अशी मागणी जागरूक नागरिक करत आहेत. तसेच काही दिवसापूर्वी वाहतूक शाखेच्या मदतीने बोईसर ग्रामपं...