ब्ल्यू डायमंड हॉटेल वाल्याने अडवला मुख्य रस्ता ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

ब्ल्यू डायमंड हॉटेल वाल्याने अडवला मुख्य रस्ता ; ग्रामपंचायतीचे  दुर्लक्ष


बोईसर : बोईसर नवापूर रोड वरील मुख्य रस्त्यालगत ब्लू डायमंड हॉटेल असून या ठिकाणी मुख्य रस्त्यावर लोखंडी पाईप टाकून लोखंडी साखळी लावून रस्ता अडवणूक केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते व पदपथावर चालणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे परंतू ग्रामपंचायत कारवाई करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेत असल्यामुळें नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्राकडे तसेच आजुबाजुच्या इतर गावाकडे जाण्यासाठी बोईसर वरून नवापूर रोड हा मुख्य रस्ता असून याच नवापूर रोडवरील मुख्य रस्त्यालगत असलेल्या ब्ल्यू डायमंड हॉटेल वाल्यांनी भर रस्त्यावर लोखंडी पाईप व चेन साखळी लावल्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता अधिक अरुंद झाला आहे. त्यामुळे रस्त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या वाहांनाची व पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. ग्रामपंचायत या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करत आहे. हॉटेल वाल्याने लोखंडी पाईप व चेन रस्त्यावर मांडून वाहतूक कोंडी करू नये, अशी मागणी जागरूक नागरिक करत आहेत.

तसेच काही दिवसापूर्वी वाहतूक शाखेच्या मदतीने बोईसर ग्रामपंचायतीकडून फेरिवाले हटाव मोहिम सुरू करण्यात आली होती. या कौतुकास्पद कामगिरीमुळे सर्वसामान्य जनतेला वाहतूक कोंडी समस्यांपासून काही क्षण मोकळा श्वास मिळालेला असताना पुन्हा एकदा अतिक्रमण करून रस्ता अडवणूक होत असल्यामुळे  ग्रामपंचायतीच्या या थातुरमातुर कारवाईकडे सर्वांनीच शंका उपस्थित केली आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी