एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट कडून 'भारत निर्माण योगदान अवॉर्ड 2025' मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न

एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट कडून 'भारत निर्माण योगदान अवॉर्ड 2025' मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न


मुंबई – एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट कडून 'भारत निर्माण योगदान अवॉर्ड 2025' हॉटेल जिंजर, मुंबई येथे आयोजित करण्यात आले. या सोहळ्याला ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी अध्यक्ष डॉ. घनशाम कोळंबे, डॉ. एम. पी. जेकब, मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मेमाणे, सिनियर उपाध्यक्ष डॉ.राज काळे, डॉ. राज शेखर, डॉ. अमजद खान पठाण, माजी महापौर बाबूभाई भवानजी, चित्रपट दिग्दर्शक अंकुर मेहबुक खान, बिग बॉस फेम रोहित शिंदे, मंदार तांडेल, दीपक गिलानी (फॅशन डिझायनर), ए. सी. पी. रीहाना शेख, दिग्दर्शक राहुल वूरा, अभिनेते नितीन देसाई, ट्रस्टचे समन्वयक संतोष हंकारे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. 

गेल्या 11 वर्षांपासून एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट आरोग्य शिबीर, अन्नदान आणि इतर सामाजिक उपक्रम राबवत आहे. ट्रस्टने मुंबई आणि दिल्लीमध्ये मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम आयोजित केले. यावेळी राजकीय नेते, पोलीस अधिकारी, डॉक्टर, चित्रपटसृष्टीतील अभिनेते, अभिनेत्री, वरिष्ठ शासकीय अधिकारी, उत्तर प्रदेशमधील अभिनेते, लेखक, पत्रकार यांसारख्या विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे आयोजन डॉ. घनशाम कोळंबे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या मान्यवरांनी डॉ. आश्रुभाऊ खेडेकर, राधा आहेर, गजेंद्र सोळंकी, गजानन दुबल, वैभवी कदम, दस्तगीर शेख, बाळकृष्ण सणास, गणेश वाघ, विजय पाटकर, शेख जमील शेख उस्मान, विद्या शिंदे, प्रशांत गवळी, संतोष सिंग यांना मान्यवर डिग्री तसेच 'पीस अंबेसीटर' म्हणून डॉ. शोनित भट, डॉ. विजयकुमार पंडित, डॉ. राजेंद्र बोरकर, डॉ. विजय नायडू, डॉ. स्नेहा दोबले, डॉ. सोमशेखर के. यांना 'भारत निर्माण योगदान अवॉर्ड 2025' देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पालघर जिल्ह्यातील समाजसेवक ललित माळी आणि माधव सावे यांच्यासोबतच पत्रकार ज्ञानेंद्र पांडे, स्वप्निल पिंपळे, जे पी जयस्वाल यांना ही अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू