५० उठाबश्याच्या शिक्षेनंतर विद्यार्थिनीला उलट्या व पोटदुखीचा त्रास

पालघरच्या भगिनी समाज शाळेतील धक्कादायक प्रकार 

५० उठाबश्याच्या शिक्षेनंतर विद्यार्थिनीला उलट्या व पोटदुखीचा त्रास 


पालघर : भगिनी समाज शाळेत दहावीत शिकणारी विद्यार्थिनी द्विता विनोद पाटील हिला शाळेत यायला उशीर झाल्याने कडव्या शिक्षेमुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. फक्त पाच मिनिट उशीर झाले म्हणून मुख्याध्यापिकेने तिला 50 उठाबशा काढायला लावल्या , ज्यामुळे तीला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला आहे. सध्या तिच्यावर एक खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप आहे, त्यांनी मुख्याध्यापिकेवर मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याचा आरोप केला आहे. द्विताच्या पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शाळा प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. हे प्रकार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी चिंताजनक आहेत आणि अशा शिक्षण पद्धतीवर कठोर कारवाईची मागणी पालकांकडून केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

आरती ड्रग्समध्ये वायूगळती; सालवड-शिवाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण

बोईसरमध्ये ११ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

डहाणूतील भीम बांधावर दुर्दैवी घटना – पर्यटक महिलेचा बुडून मृत्यू; १८ तासांनंतर मृतदेह सापडला