एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने तारापूर पोफरण येथे महिला मेळावा संपन्न

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने तारापूर पोफरण येथे महिला मेळावा संपन्न


तारापूर : महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद पालघर अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पालघर च्या वतीने 16 जानेवारी रोजी तारापूर पोफरण येथे महिला मेळावा पोफरण गावच्या सरपंच प्रीती ठाकूर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला.

त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य भावना विचारे, एडवोकेट निखिल राऊत ,उपसरपंच सचिन ठाकूर ,बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार, पर्यवेक्षिका दिपाली संखे ,दिपाली पाटील विस्तार अधिकारी , प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभवी देशपांडे, तारापूर पोलीस ठाण्याचे महिला पोलीस अधिकारी प्रशीला मॅडम व नीता भोईर , अंगणवाडी सेविका ,मदतनीस , आशा, पोस्ट ऑफिस मधील कर्मचारी,गावातील महिला व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.परिषद सदस्य भावना विचारे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की अंगणवाडीच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे तसेच महिलांचा आहाराबाबत माहिती देऊन अंगणवाडीच्या कामाचे कौतुक केले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच प्रीती ठाकूर यांनी मातांनी आपल्या बालकांना अंगणवाडी मध्ये नियमितपणे पाठवण्याचे आवाहन केले.

ग्रामपंचायत पोफरण येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये वकिलांमार्फत महिलांचे हक्क ,वारसाहक्क ,स्त्री धन ,बालविवाह प्रतिबंधक, कौटुंबिक हिंसाचार , पोस्को कायदा इत्यादी बाबत माहिती देण्यात आली. तसेच पोलीस महिला अधिकारी यांनी महिलांवरील अत्याचाराचा प्रतिबंध सोशल मीडिया बाबत माहिती दिली.तर डॉक्टरांनी  आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. बाल विकास प्रकल्प अधिकारी पालघर अमोल पवार यांनीही मार्गदर्शन केले तसेच ICDS योजनेबाबत सेविकांनी पथनाट्यद्वारे जनजागृती केली स्त्रीभ्रूणहत्या थांबवणे बाबत सेविकांनी नाटिका सादर केली. तसेचअंगणवाडीतील बालकांचे  सांस्कृतिक कार्यक्रम ही घेण्यात आले. पाककृती स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले पाककृतीच्या माध्यमातून आहारातील अन्य घटका बाबत माहिती देण्यात आली. रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून योजनांबाबत जनजागृती करण्यात आली. गरोदर माता व स्तनदा मातांना बालांत विडा याबाबत महिलांना सविस्तर माहिती देण्यात आली व बाळंत विड्याचे वाटप करण्यात आले. महिलांनी रांगोळीच्या माध्यमातून विशेष विषय मांडले . पालकांनी तयार केलेला आरोग्यदायी पोषणयुक्त पदार्थाचे प्रदर्शन भरवण्यात आले. सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम तारपा नृत्य करून सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. बचत गटाच्या अध्यक्षा सचिव ग्रामपंचायतच्या महिला सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला तसेच सांस्कृतिक कार्यक्रम रांगोळी व पाककृतीमध्ये सहभाग घेणाऱ्या बालकांना व महिलांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे नियोजन गौरी गोविंद धांगडा व रत्नमाला गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निशिदा संखे व मनस्वी पाटील यांनी केले

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक