महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकाचा दर्शन घेऊन परतताना मृत्यू
महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकाचा दर्शन घेऊन परतताना मृत्यू
पालघर : डहाणूच्या प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकाचा दर्शन घेऊन परतताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे . मिलन डोंबरे असं या पंचवीस वर्षीय तरुणाचं नाव आहे.
मिलन डोंबरे हा तलासरी तालुक्यातील वेवजी येथील रहिवासी असून सकाळी पहाटे आपल्या कुटुंबीयांसोबत डहाणूच्या प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी गडावर निघाला दर्शनासाठी जाताना मिलन गडावर हजार पायऱ्या सहजच चढला मात्र उतरताना त्याला अचानक उलटी झाली मीनल ला अस्वस्थ वाटत असल्याने त्याला खाली उतरताना खूप त्रास होऊ लागला मात्र त्याच्यासोबत असलेला त्याच्या भावाने त्याला खांद्यावर घेत त्याला हॉस्पिटलला प्रथम उपचार कसा मिळेल या दृष्टिकोनातून त्यांची धडपड सुरू झाली मिलन च्या कुटुंबीयांनी मिलन ला खांद्यावर घेऊन कासा उपजिल्हा रुग्णालय गाठलं मात्र तोपर्यंत मिलन चा अर्ध्या वाटेतच मृत्यू झाला होता .पोटात अन्न नसताना अति उंचावर चालल्याने मिलनचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे . दरम्यान सवय नसेल तर अचानक ट्रेकिंग साठी ट्रेकर्सने जाऊ नये असा आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं असून अशाच ट्रेकिंगच्या आवडीतून मिलन ला आपला जीव गमावा लागला . त्यामुळे ट्रेकिंग करताना आधी शरीराची थोडीफार कसरत करून नंतरच ट्रेकिंग करा असा आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आल आहे.
Comments
Post a Comment