बोईसर कला क्रीडा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १६९ शाळेतील १८८०५ विद्यार्थ्यांचा सहभाग
बोईसर कला क्रीडा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १६९ शाळेतील १८८०५ विद्यार्थ्यांचा सहभाग
बोईसर : महाराष्ट्र स्पोर्टस एज्युकेशन ॲकॅडमी - तारापूर या संस्थेतर्फे प्रतिवर्षी आयोजित बोईसर कला क्रीडा महोत्सव २०२५ हे ९ ते १२ जानेवारी या कालावधीत संपन्न झाले. सन २००६ पासून सातत्याने हा महोत्सव यशस्वीपणे संपन्न होत असून महोत्सवाचे हे एकोणीसावे वर्ष होते. यात ४८ कला क्रीडा प्रकारात, १५७ स्पर्धा प्रकार, यामध्ये १६९ शाळांचा सहभाग होता. त्यात १८८०५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमी तारापूर, आयोजित बोईसर कला-क्रीडा महोत्सव वर्ष-१९ वे, सहआयोजक डॉन बॉस्को स्कूल बोईसर व बोईसर एज्युकेशन सोसायटी मधील सर्व सदस्यांनी खोदराम बाग मैदानावर महोत्सव यशस्वीपणे पार पाडला. यात ४८ कला क्रीडा प्रकारात, १५७ स्पर्धा प्रकार, यामध्ये १६९ शाळांचा सहभाग होता. त्यात १८८०५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विविध कला व क्रीडा प्रकारांचा उत्सव ज्यामध्ये सांस्कृतिक आणि शारीरिक कौशल्य पाहायला मिळतो. यामध्ये पारंपरिक व आधुनिक कलेचे सादरीकरण , विविध खेळांचे आयोजन तसेच गट सामूहिक व वैयक्तिक स्पर्धा होतात. सामूहिक सहभाग., संस्कृती आणि परंपरेचा प्रचार क्रिडा विषयक जागरूकता, नवोदित प्रतिभांना संधी , कला व क्रीडा महोत्सवात समाजात एकतेचा आणि उत्साहाचा संदेश देतो. नवा पिढीला आपल्या परंपरा क्रीडा क्षेत्राशी जोडण्याची कार्य करतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने अकॅडमी दरवर्षी महोत्सवाचे आयोजन करीत असते. ग्रामीण विद्यार्थ्यांना कला-क्रीडा मध्ये संधी मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत होते. खेळातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण होते. या महोत्सवात पालघर, डहाणू, वाडा, तलासरी, जव्हार या तालुक्यातील दुर्गम भागातील पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. शारीरिक, बौद्धिक, कौशल्य विकास निर्माण होतो. एक संघटित भावनेने हा महोत्सव संपन्न झाला. मार्चपास संचलन, लेझीम स्पर्धा, मल्लखांब, पिरॅमिड, व्हॉलीबॉल , कबड्डी , वक्तृत्व , लोकनृत्य , लंगडी, खो-खो हस्ताक्षर, चित्रकला, रंगभरण, थ्रो बॉल, थीम डान्स , वैयक्तिक मैदानी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, कथाकथन, पारंपारिक नृत्य , कराटे, बुद्धिबळ, कॅरम, बॉक्स क्रिकेट, वेशभूषा स्पर्धा ,एकत्र अभिनय, समूह नृत्य स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले होते .
महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमी द्वारे सेवाव्रतींना, कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्याऱ्या मान्यवरांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाते. यामध्ये प्रथमोपचार व तत्पर सेवेसाठी डॉ. जान्हवी संजय पाटील, डिलिशिया डिमेलो, मानसी सुधाकर ठाकूर, आशिका शाम संखे, MSEAT- मित्र पुरस्कार नापेश संखे, सुशील बाळापुरकर, अंजना रॉय, जयसिंग धोडी, वेदप्रकाश यादव, MSEAT- रत्न पुरस्कार विनायक राऊत, MSEAT- कला श्री. पुरस्कार - संजय साळुंखे, MSEAT- क्रीडा श्री. पुरस्कार - आशिष नरोत्तम पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी परिसरातील अनेक नामावंत शाळेतील शिक्षकांचा सहभाग उल्लेखनीय होता. सुधाकर ठाकूर, नरेंद्र घरत, कमळाकर पाटील, आशिष पाटील, विनय मकासरे, पौर्णिमा कुंभार, सत्येंद्र यादव, जबीर खान, जितेंद्र पाटील, शैलेंद्र घरत, मिथुन तुंबडा, कोमल पागधरे, रोहित बारी, सागर मोरे, राखी मंडळ, आनंद मेहेकर, तनुजा कुरेवार, सचिन भालेकर, धनश्री कांबळे, धनेश संखे, दीपक भावे, सचिन गांधी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनवाने, जितेंद्र अग्रवाल, राजेंद्र पाटील, विनायक राऊत, अतुल देसाई, मिलिंद वडे, विनोद पिंपळे, शाम संखे, महेंद्र भोणे, दशरथ सुतार, नितीन ठाकूर, समिर पिंपळे, अशोक बाबर, रोहित पाटील, सचिन पिंपळे, खजिनदार गजानन देशमुख, सहसचिव राम पाटील, नीता संखे, समिधा ठाकूर, अकॅडमीचे सचिव प्रा. संजय घरत, उपाध्यक्ष ब्रँडन आल्मेडा, हेमंत मुंजे, प्रज्ञा राऊत कार्याध्यक्ष डॅरल डिमेलो व अध्यक्ष संजय ज. पाटील उपस्थित होते.
Comments
Post a Comment