पालघरच्या समुद्र किनारी सापडलेल्या ८० लाख रुपयांचा चरस विक्री करणारा ठाणे पोलिसांच्या जाळ्यात
पालघरच्या समुद्र किनारी सापडलेल्या ८० लाख रुपयांचा चरस विक्री करणारा ठाणे पोलिसांच्या जाळ्यात पालघर : सातपाटी समुद्रकिनारी सापडलेले अफगाणी चरस विकण्यासाठी पालघरमधील एक व्यक्ती चरस विक्री करण्यासाठी ठाण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली असता, त्याच्यावर पाळत ठेवून त्याच्या ताब्यातील ८० लाख रुपयांचे चरस ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त केले असुन याप्रकरणी अभय परशुराम पागधरे (४३) या आरोपीसह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. यात सहभागी असलेल्या अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. सातपाटी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातपाटी गावातील संजय अंभिरे याला समुद्रकिनारी अफगाण प्रोडक्ट असे नाव छापलेले आठ किलो ८२ ग्रॅम वजनाचे चरस हे मादक द्रव्य मिळाले. त्याने ते पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी पैशांच्या मोहापोटी डहाणू तालुक्यातील कासा गावातील नातेवाईक अभय परशुराम पागधरे याच्याकडे दिले. त्याने त्याची विक्री सुरू केली होती. अभय पागधरे हा ठाण्यातील घोडबंदर, माजीवडा नाका येथे चरस विक्री करण्याचा प्रयत्न करत असताना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढग...