जनतेचा वाली साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक विजय घरत यांची जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड

जनतेचा वाली साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक विजय घरत यांची जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड

पालघर : मराठी पत्रकार परिषदेच्या पालघर जिल्हा शाखेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जनतेचा वाली साप्ताहिक वृत्तपत्राचे व  युट्युब चॅनेलचे संपादक विजय घरत यांनी विजय मिळवला यात अध्यक्ष पदासाठी दोन अर्ज दाखल झाल्याने अध्यक्ष पदासाठी मतदान घेण्यात आले. सरचिटणीस आणि खजिनदार पदासाठी प्रत्त्येकी एक अर्ज आल्याने सुमित पाटील यांची सरचिटणीस तर खजिनदार पदी रुपेश मोकाशी यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.


रविवारी पालघरच्या शासकीय विश्रामगृहात निवडणूक पार पडली.दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले,साडे तीन वाजता मतदान पार पडले तर चार वाजता मतमोजणी करण्यात आली. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या निवडणूकीत मराठी पत्रकार परिषदेच्या पालघर जिल्हा शाखेच्या 22 सदस्यांनी मतदानाचा अधिकार बाजवला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार नीरज राऊत यांनी काम पाहिले.


यावेळी मावळते अध्यक्ष हर्षद पाटील,सरचिटणीस मंगेश तावडे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी