तहसीलदारांचे आदेश असताना प्रजापती व गुप्ता यांचे बांधकाम निष्कासित करण्यास मंडळ अधिकारी व तलाठ्याची टोलवाटोलवी...

तहसीलदारांचे आदेश असताना प्रजापती व गुप्ता यांचे बांधकाम निष्कासित करण्यास मंडळ अधिकारी व तलाठ्याची टोलवाटोलवी...


बोईसर : मौजे सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अवधनगर येथिल सरकारी भूखंडावर अतिक्रमणांना वेग आलेला असून त्या भूखंडावरील बांधकामांत अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत.

सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अवधनगर हा विभाग भु माफियाचा केंद्र बनला असुन येथे मोठ्या प्रमाणात सरकारी जागेवर अतिक्रमण होत आहेत परंतु हाकेच्या अंतरावर असलेल्या मंडळ अधिकारी कार्यालय असुनही ठोस कारवाई होत नसल्यामुळे अतिक्रमण करण्याऱ्याचे मनोबल वाढता दिसून येत आहे. यात मौजे सरावली सरकारी सर्वे नंबर - १००/२६ या भूखंडावर रामयज्ञ रामप्याचे प्रजापती व ताराचंद लखपत गुप्ता यांनी इमारतीचे बांधकाम केले आहे . तर या प्रकरणी तहसीलदार रमेश शेंडगे यांनी हे सर्व बांधकामे निष्कासित करण्यासाठी मंडळ अधिकारी बोईसर व तलाठी सजा सरावली यांना माहे सप्टेंबर महिन्यात लेखी आदेश दिलेले असून ग्रामपंचायत निवडणुकीत व्यस्त असल्याचे कारण पुढे करत सदर बांधकामे निष्कासित करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत मंडळ अधिकारी मनिष वर्तक व तलाठी हितेश राऊत यांनी टोलवाटोलवी करत या अतिक्रमणधारकांना एकप्रकारे संरक्षण देत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी