भारतीय जनता पार्टीच्या पालघर पश्चिम मंडळ उपाध्यक्ष पदी हर्षल पिंपळे यांची नियुक्ती
भारतीय जनता पार्टीच्या पालघर पश्चिम मंडळ उपाध्यक्ष पदी हर्षल पिंपळे यांची नियुक्ती
हर्षल कमळाकर पिंपळे यांची भारतीय जनता पार्टी पालघर पश्चिम मंडळ उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्रातील जनतेचे लाडके कार्यक्षम उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच पालघर विधानसभा निवडणूक प्रमुख संतोषजी जनाठे ह्यांच्या कार्याला प्रेरित होऊन आज पालघर जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्रीं नामदार रविंद्रजी चव्हाण ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत हर्षल कमळाकर पिंपळे ह्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करुन त्यांची भाजपा पालघर पश्चिम मंडळ उपाध्यक्ष म्हणुन नियुक्ती करण्यात आली
याप्रसंगी जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय भरतभाई राजपुत, जिल्हा सरचिटणीस अशोकजी वडे, पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज जी कोरे, पालघर पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रमोदजी आरेकर, बोईसर मंडळ अध्यक्ष महेंद्र भोणे उपस्थित होते.
माझ्या संघटन कौशल्याने तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे संघटन आणखी मजबुत करण्याचे मनोगत प्रसार माध्यमांसमोर हर्षल पिंपळे यांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment