बोईसर मध्ये भेसळयुक्त मावाची सर्रासपणे विक्री
बोईसर मध्ये भेसळयुक्त मावाची सर्रासपणे विक्री
बोईसर : बोईसर मध्ये आजुबाजूच्या परिसरातील हॉटेल मध्ये भेसळयुक्त मावा विकण्याच काम जोरात सुरु असुन लोकांच्या आरोग्याशी खेळण्याच काम सुरु आहे.
बोईसर येथील सिडको वसाहतीमध्ये तीर्थराज मावा दुकानदार तीर्थराज यादव नामक व्यक्ती सुरत व मुंबईहून निकृष्ट दर्जाचा मावा घेऊन तो मावा फ्रीज व बॉक्समध्ये साठवून तो बोईसर ,महालक्ष्मी ,नागझरी व इतर मिठाईच्या दुकानांमध्ये विकत असल्याने ही मिठाई खाणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्यस निश्चितच स्थानिकारक ठरू शकते.मागील काही दिवसांपूर्वी बनावट कंपनीचा मावा घेऊन जाणारा टेम्पो मुंबई महामार्गावर पकडला होता. त्या टेम्पोमध्ये असलेला मावा आणि तीर्थराज मावा दुकानदाराकडे असणारा मावा हा एकच असून हा यादव नामक व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून हा खवा विकून जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. हा मावा खाऊन अनेक व्यक्तींच्या आरोग्यास इजा पोचली असेल ह्यात दुमत नाही.
तीर्थराज मावा दुकानदाराने भाडे तत्वावर घेतलेल्या सिडको वसाहतीच्या खोलीमध्ये दिवस रात्र हा भेसळ युक्त धंदा करीत असून त्या धंद्याकरिता वापरला जाणारा विद्युत प्रवाहाचा मीटर हा घरगुती स्वरूपाचा आहे .म्हणजेच ह्या दुकानदाराने विजेचे मोठी चोरी केली आहे. हे बोलणे वावगे ठरणार नाही.
बोईसर सिडको वसाहती मधील भाडेतत्त्वावर घेतलेल्या खोलीमध्ये तीर्थराज मावा दुकानदार तीर्थराज यादव ह्यांनी सुरू केलेल्या अनधिकृत धंद्याची कसून तपासणी करत,त्याने केलेली विजेची चोरी व बनावट मावा विकुन जनतेच्या आरोग्याशी खिळवाड केल्या प्रसंगी त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामान्य जनतेकडून होताना दिसत आहे.
Comments
Post a Comment