पालघरच्या समुद्र किनारी सापडलेल्या ८० लाख रुपयांचा चरस विक्री करणारा ठाणे पोलिसांच्या जाळ्यात

पालघरच्या समुद्र किनारी सापडलेल्या ८० लाख रुपयांचा चरस विक्री करणारा ठाणे पोलिसांच्या जाळ्यात


पालघर : सातपाटी समुद्रकिनारी सापडलेले अफगाणी चरस विकण्यासाठी पालघरमधील एक व्यक्ती चरस विक्री करण्यासाठी ठाण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली असता, त्याच्यावर पाळत ठेवून त्याच्या ताब्यातील ८० लाख रुपयांचे चरस ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त केले असुन याप्रकरणी अभय परशुराम पागधरे (४३) या आरोपीसह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. यात सहभागी असलेल्या अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

 सातपाटी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातपाटी गावातील संजय अंभिरे याला समुद्रकिनारी अफगाण प्रोडक्ट असे नाव छापलेले आठ किलो ८२ ग्रॅम वजनाचे चरस हे मादक द्रव्य मिळाले. त्याने ते पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी पैशांच्या मोहापोटी डहाणू तालुक्यातील कासा गावातील नातेवाईक अभय परशुराम पागधरे याच्याकडे दिले. त्याने त्याची विक्री सुरू केली होती. अभय पागधरे हा ठाण्यातील घोडबंदर, माजीवडा नाका येथे चरस विक्री करण्याचा प्रयत्न करत असताना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे, भूषण शिंदे, उपनिरीक्षक सुनील अहिरे, हवालदार अजय साबळे, सुशांत पालांडे, माधव वाघचौरे, पोलीस नाईक उत्तम शेळके, पोलीस शिपाई यश यादव यांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांना ८ किलो ८२ ग्रॅम वजनाचे ८० लाख ८२ हजार रुपये किमतीचे चरस आढळून आले दरम्यान, सातपाटी समुद्रकिनारी अफगाणी चरसचे पाकीट मिळाल्याचे उजेडात आल्यानंतर पालघर किनारपट्टीवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. अशा प्रकारची मादक पदार्थांची पाकिटे मिळाल्यास जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी