बोईसर मध्ये यूरिया खताच्या बेकायदा साठ्यावर पोलिसांची कारवाई
बोईसर मध्ये यूरिया खताच्या बेकायदा साठ्यावर पोलिसांची कारवाई
बोईसर : बोईसर चिल्हार मार्गावरील गुंदले येथील वाघोबा खिंडीजवळ आतल्या रस्त्यावर एका गोदामावर छापा टाकून शेतीच्या वापरासाठी असलेल्या युरिया खताचा संशयित साठा बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे.
शेतकऱ्यांसाठी अनुदान किमतीत शासन खत उपलब्ध करून देत असताना माफियांकडून शेतकऱ्यांच्या खतावर डल्ला मारून तो खत साठा औद्योगिक उपयोगासाठी वापरात आणून बक्कळ नफा कमावणाऱ्या माफियावर बोईसर पोलीसांनी कारवाई करीत ७५ गोणी निमकोटेड युरियाचा साठा सोमवारी जप्त केला आहे.
बोईसर चिल्हार मार्गावर ३१ डिसेंबरच्या रात्री गस्त सुरु असताना बोईसर पोलिसांना बघून काही तरुण पळून गेले. पोलिसानी यांच संशयावरून गुंदले येथील आडमार्गाने एका गोदामावर छापा टाकला असता त्या ठिकाणी शेतीच्या वापरासाठी असलेल्या ५० किलोच्या ७५ गोण्या (तीन टन ) निमकोटेड युरियाचे बेकायदा साठा साठवणुक केल्याचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान चौधरी यांना आढळून आले. त्यानंतर बोईसर पोलिसांनी तात्काळ पालघर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर जिल्हा गुणनियंत्रण निरिक्षक प्रकाश राठोड व लक्ष्मण लामकाने यांनी गोदामातील साठ्याचे नमूने घेत साठा ताब्यात घेतला आहे.
गोदामातील यूरियाचा बेकायदेशीर साठा आणि गोदामाचे मालक यांची बोईसर पोलिसांकडून चौकशी सुरू असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक भगवान चौधरी हे करीत आहेत.
Comments
Post a Comment