तारापुर औद्योगिक क्षेत्रातील ग्लेनफिन केमिकल कारखान्यात एका कामगाराचा जळून मृत्यु
तारापुर औद्योगिक क्षेत्रातील ग्लेनफिन केमिकल कारखान्यात एका कामगाराचा जळून मृत्यु
बोईसर : तारापुर औद्योगिक क्षेत्रातील ग्लेनफिन केमिकल प्रा. लि. भूखंड क्रमांक टी - १२७ या कारखान्यात ट्रे डायर मध्ये आग लागून अनुराग पाल १८ वर्षे व विशाल सरोज २० वर्षे हे दोन्ही कामगार आगीत होरपळून भाजले होते. त्यातील विशाल सरोज या कामगाराचा मृत्यू झाला आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात दिवसेंदिवस
आगीच्या घटनामध्ये वाढ होत असुन त्यात निष्पाप कामगारांचा बळी जात आहे. परंतु ह्या घटनांकडे संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने तसेच कारखान्याचे मालक , व्यवस्थापन यांच्या दुर्लक्ष व असुरक्षितेमुळे ह्या घटना घडल्याचे स्थानिक पातळीवर आरोप केले जात आहेत .
असाच प्रकार तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक टी - १२७ मेसर्स ग्लेनफिन केमिकल प्रा. लि. या कारखान्यात एका कामगाराचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. हि घटना शुक्रवार दि.१९ जानेवारी रोजी रात्री ११ ते ११:३० च्या दरम्यान ट्रे डायर मध्ये आग लागून अनुराग पाल १८ वर्षे व विशाल सरोज २० वर्षे हे दोन्ही कामगार आगीत होरपळून भाजले होते. त्यांना तात्काळ तुंगा इस्पितळात दाखल करण्यात आले होते, परंतु या दोन्ही कामगारांची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्यामुळे रबाळे येथिल नॅशनल बर्न इस्पितळात दाखल करण्यात आले. या आगीत अनुराग पाल हा ३० टक्के व विशाल सरोज ६८ टक्के भाजल्याचे औद्योगिक सुरक्षा अधिकारी हिम्मतराव शिंदे यांनी दुरध्वनी द्वारे सांगितले होते. २६ जानेवारी रोजी सकाळी ठिक ११ वाजता आगीत होरपळून ६८ टक्के भाजलेला कामगार विशाल सरोज याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कारखान्यात कामगारांना पुरेशी सुरक्षा उपकरणे पुरविले जात नसून कारखान्यात प्रशासनाची हलगर्जीपणामुळे कामगारांच्या जीवावर बेतले आहे.
" सदर प्रकरणाची माहिती कारखान्यामधून मिळालेली आहे. नेमका अपघात कशामुळे झाला याची कसून चौकशी केली जाईल. :- हिम्मतराव शिंदे - औद्योगिक सुरक्षा अधिकारी "
Comments
Post a Comment