दाखल घरफोडी गुन्हयाची उकल करण्यात बोईसर पोलीसांना यश : 14 लाखाचा मुद्देमाल जप्त
दाखल घरफोडी गुन्हयाची उकल करण्यात बोईसर पोलीसांना यश : 14 लाखाचा मुद्देमाल जप्त बोईसर : इंस्टाकार्ट सर्विसेस प्रा. लि. शाखा बोईसर येथे नोकरी करण्याऱ्या अमोल मच्छींद्र थोरात वय 31 वर्ष रा. रु. नं 105, बी विंग रिद्धि सिद्धि अपार्टमेंट, खैरेपाटक, बोईसर पूर्व याने 24 जुलै 2023 रोजी पोलीसांना फिर्यादी दिली की 23 जुलै 2023 रोजी 23.45 वा ते 24 जुलै 2023 रोजी सकाळी 05.12 वाजेच्या दरम्यान अंगात रेनकोट व डोक्यात हेल्मेट घातलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी हे कार्यरत असलेल्या इंस्टाकार्ट सर्विसेस प्रा. लि. शाखा बोईसर च्या गाळा नं. 11 चे शटरचे लॉक तोडून व शटर उचकटून त्यावाटे आतमध्ये प्रवेश करून आतमधील कपाटाचे लॉक तोडून कपाटातील लॉकरमध्ये असलेली रोख रक्कम 10,51,000/- रूपये व 3,77,185/-रूपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन, इलेक्ट्रीक वस्तु व सौदर्यप्रसाधने असा एकूण 14,23,185/- रूपये किंमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून नेलेबाबत बोईसर पोलीस ठाणे येथे कलम 457, 380, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर व पंक...