बोईसर शहरातील ठाकुर गैलेक्सी येथील सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, १३ गुन्हयांची उकल
बोईसर शहरातील ठाकुर गैलेक्सी येथील सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, १३ गुन्हयांची उकल
पालघर : सफाळा पोलीस ठाणे हद्दीतुन वाहन चोरी करुन बोईसर येथील यशवंत सृष्टी मधील ठाकुर गैलेक्सी येथे सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला सफाळे पोलीसांन कडून अटक करण्यात आली असुन आरोपीकडून १३ गुन्ह्यांची उकल करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दिनांक १५ जुलै २०२३ रोजी मौजे पारगाव गावदेवी मंदिराचे समोर असलेले ओम साई ऑटो सर्व्हिस सेंटर समोरून स्कूटी क्रमांक एम.एच. ४८ सीजी ९३८७ एक अज्ञात इसम चोरी करून पळून गेल्या बाबत सफाळा पोलीस ठाणे येथे गुन्हा र. नं.६५/२०२३ भा.द.वि.सं कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता . चोरी केलेल्या स्कूटर वर त्याच दिवशी रात्री ८ वाजून २० मिनिटाला बोईसर शहरातील यशवंत सृष्टी मधील एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी आरोपीने जबरीने खेचत पळ काढला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळासाहेब पाटील, पोलीस अधिक्षक पालघर यांचे आदेशान्वये श्रीमती निता पाडवी, उप विभागीय पोलीस अधिकारी पालघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/ अमोल गवळी प्रभारी अधिकारी सफाळा पोलीस ठाणे यांनी पोलीस पथक तयार करून गुन्हेगाराची गुन्हे करण्याची पद्धत तसेच सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक तसेच गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपी कमलेश रामानंद गुप्ता वय ३३ वर्षे, रा. रूम नंबर २०४ पियूष मॅजेस्टिक, निर्मल नगर रोड दिवा पश्चिम जि. ठाणे याला त्याचे राहते पत्यावर जावून रात्रीचा सापळा रचून सोमवारी दिनांक १७ जुलै रोजी ताब्यात घेत चौकशी केली असता सदर घटनेची कबुली देत चोरी केलेली स्कूटर आणि सोनसाखळी आरोपीकडून हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीला अटक केली असून त्याचे विरुद्ध सफाळा पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं.६५/२०२३ भा.द.वि.सं कलम ३७९ अन्वये व बोईसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २८४/२०२३ भा.द.वि.सं कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याचे कडून गुन्ह्यातील मुद्देमाल ४०,००० रुपये किं. ची अँटॉर्क १२५ स्कूटी क्रमांक एम.एच. ४८ सीजी ९३८७ स्कुटर व स्कुटरच्या डिक्कीतून ६०,०००/ किंमतीची १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हस्तगत केली. सदर गुन्हाचा अधिक तपास सपोनि/ अमोल गवळी प्रभारी अधिकारी सफाळा पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात विविध कलम अंतर्गत १३ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
सदरची कामगिरी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक पालघर, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती निता पाडवी, उप विभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग, सपोनि / अमोल गवळी, प्रभारी अधिकारी, सफाळा पोलीस ठाणे, पोउपनि / मनिकेरी, बोईसर पोलीस ठाणे, पोहवा / ८४२ ए. व्ही. खोत, पोहवा / ८२० के.बी. शेळके, पोना / २२ व्ही. एन. सातपुते सर्व नेमणूक सफाळा पोलीस ठाणे, पोहवा / ४२८ विजय दुबळा, पोशि/ ८४ मयुर पाटील, पोशि/ २८० धिरज साळुंखे, नेमणूक बोईसर पोस्टे यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली आहे.
Comments
Post a Comment