पुणे शहर येथुन वाहन चोरी करुन पळून जाण्याऱ्या दोन आरोपीस पालघर पोलीसांनी केले जेरबंद

पुणे शहर येथुन वाहन चोरी करुन पळून जाण्याऱ्या दोन आरोपीस पालघर पोलीसांनी केले जेरबंद 

पालघर : दिनांक 13/07/2023 रोजी सायकांळी विजय मुतडक, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे यांना व्हाट्सऍपद्वारे विमाननगर पोलीस ठाणे, पुणे शहर पोलीसांकडून माहिती मिळाली की, विमाननगर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं 309/2023 मधील चोरीस गेलेली मोटार महिंद्रा थार कार अंदाजे किंमत 20,00,000/- रूपये ही तलासरी पोलीस ठाणे दिशेने येत आहे. त्यावरुन विजय मुतडक, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे यांनी बाळासाहेब पाटील, पोलीस निरीक्षक, पालघर यांना माहिती दिली व त्याच्या आदेशाप्रमाणे तात्काळ पथक स्थापन करुन तलासरी पोलीस ठाणे अंतर्गत आर.टी.ओ नाका दापचरी, तलासरी नाका, आच्छाड बॉर्डर चेक पोस्ट, उधवा बॉर्डर दूरक्षेत्र, नारायणठाणे कोस्टल चेक पोस्ट येथे वेगवेगळ्या ठिकाणी नाका बंदीचे आयोजन केले. त्यांनतर दिनांक 14/07/2023 रोजी सकाळी 8.30 वा. च्या सुमारास गुन्हयाचे फिर्यादी वैजनाथ खरमाटे, रा. पुणे यांचे कडून माहिती प्राप्त झाली की, सदर गुन्हयातील थार कार ही मुंबई कडून गुजरातच्या दिशेने जात असल्याची माहिती प्राप्त झाल्याने नाकाबंदीकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी व अंमलदार यांना सतर्क केले त्यानंतर 9.30 वा नमुद वर्णनाची थार कार ही दापचरी आर.टी.ओ नाका येथे प्रचंड वेगाने येत असताना नाकाबंदीकरीता नेमलेले अधिकारी व अंमलदार यांनी गाडीचा पाठलाग करुन शर्थ करुन ती शितापीने थांबविली. सदर गाडीतील इसम 1) शैलेश भिकुभाई हिंगु वय - 32 वर्ष रा. नंदनवन सोसायटी पुना गाम सूरत 2) मिलन विजयभाई जेठलाल वय 23 वर्ष, रा. चामुंडा नगर, सूरत यांना सदर गाडीसह ताब्यात घेतलेले असुन  नमूद प्रकरणी विमाननगर पोलीस ठाणे, पुणे शहर याठिकाणी गुन्हा दाखल असून तलासरी पोलीस ठाणे हे पुढील कायदेशीर कारवाई करीत आहेत.

सदरची कामगिरी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधिक्षक, पालघर, संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय मुतडक, तलासरी पोलीस ठाणे, सहा.फौज / रामभाऊ साळूबा पवार, पोहवा प्रमोद विश्वासराव पाटील, पोना सदु काशिराम भेस्कर, पोशि यशवंत गुलाबराव पाटील, सुरेश शिंगडा, पोहवा प्रसन्ना पाटील, पोशि महेश जाधव यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी