पतीने पोटात चाकुने वार करुन पत्नीची केली हत्या
पतीने पोटात चाकुने वार करुन पत्नीची केली हत्या
पालघर : जिल्ह्यातील बोईसर येथील बेटेगाव परिसरातील लोखंडी पाडा परिसरात पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. संशयित आरोपी हा गुजरातला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी बोईसर रेल्वे स्टेशन परिसरात अटक केली
पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार मिलन दीपक पवार (वय 32) आणि त्याची पत्नी मोहिनी (वय 30) या दाेघांत सातत्याने वाद हाेत असत. त्यातून भांडण हाेत असे. मिलन हा पत्नीला बेदम मारहाण करायचा. 23 जुलैला घरगुती कारणावरून या दोघांमध्ये माेठा वाद झाला. मिलन पवार याने माेहिनीला वायरने आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर तिच्या पोटात चाकूने वार करून तिची हत्या करुन तेथून ताे फरार झाला. याप्रकरणी मृत महिलेची सावत्र बहिण चंदा वाघरी यांनी बोईसर पोलीस ठाण्यात मिलन याच्याविराेधात तक्रार दिली. बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी मिलन पवार याच्यावर पाेलिसांनी (कलम 302 अन्वये) खूनाचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान मिलन पवार हा गुजरात येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला सापळा रचून बोईसर रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांनी अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली.
Comments
Post a Comment