पालघर पोलीसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या बारा आरोपींच्या टोळीवर केली कारवाई
पालघर पोलीसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या बारा आरोपींच्या टोळीवर केली कारवाई
पालघर : दिनांक १८ जुलै २०२३ रोजी पहाटे तीन वाजून पंधरा वाजताच्या सुमारास पालघर पूर्व येथील नवली फाटका जवळील एसबीआय बँकेच्या एटीएम च्या बाजूला दरोड्याच्या तयारीत असलेल्या एकूण बारा आरोपींच्या टोळीवर पालघर पोलीस ठाणे यांच्याकडून कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पालघर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्याकरिता जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस ठाणे हद्दीत प्रभावीपणे गस्त घालण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने पालघर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी रात्रौगस्तीकरीता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना नेमले होते. दिनांक १७ जुलै २०२३ रोजी रात्री नऊ वाजता ते दिनांक १८ जुलै २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलीस उपनिरीक्षक संकेत पगडे यांना रात्रौगस्त अधिकारी म्हणून नेमले होते. तसेच पो. हवालदार रवींद्र गोरे, आर एम पवार, पो. नाईक लहांगे यांना पालघर शहर पेट्रोलिंग व गुड मॉर्निंग स्कॉड कर्तव्याकरीता नेमण्यात आले होते.
त्यानुसार पालघर रेल्वे स्टेशन ते नवली फाटक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना दिनांक १८ जुलै २०२३रोजी पहाटे तीन वाजून पंधरा वाजताच्या सुमारास पालघर पूर्व येथील नवली फाटका जवळील एसबीआय बँकेच्या एटीएम च्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत अंधाराच्या ठिकाणी काही इसम दोन मोठे टेम्पो सह संशयितरित्या काहीतरी हालचाली करीत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे पोलीस हवालदार गोरे यांनी लागलीच रात्रौगस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पगडे यांना सदरची माहिती देऊन सदर ठिकाणी बोलावले असता ते लागलीच पालघर पोलीस ठाण्यातील इतर पोलीस स्टाफ यांना सोबत घेऊन सदर घटनास्थळी हजर झाले पोलीस स्टाफ हे त्यांच्याकडील बॅटरीच्या उजेडाच्या सहाय्याने लपून बसलेला अनोळखी संशयित इसमाचा कसोशीने शोध घेत असताना त्यादरम्यान सदर संशयित हे पोलिसांच्या हालचालीवर लक्ष ठेवून अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा तयारीत असताना मोठ्या शिताफीने तसेच आजूबाजूस राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या मदतीने संशयित एकूण बारा इसमाचा पाठलाग करून त्यांना पकडून ताब्यात घेतले त्यांच्याकडे कसून चौकशी करून अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन चार चाकी मोटर टेम्पो, लोखंडी कटर , लोखंडे धारदार कोयता , नॉयलॉन दोर , लोखंडी कटावणी दोन हँडलचे खिळे काढण्याचे लोखंडी कटर, वायर कापण्याचे लोखंडी कटर तसेच मिरची पूड असे साहित्य आरोपी यांच्याकडे मिळून आल्याने आरोपी यांना दरोडा टाकण्याबाबत उद्देश स्पष्ट झाल्याचे आरोपीविरुद्ध पालघर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर १७२ / २०२३ भा.द.वि.स कलम ३९९,४०२ सह आर्म ऍक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हाचा अधिक तपास हा पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी, पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक मंजुषा शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक बालाजी मुंडे, पोलीस उपनिरीक्षक संकेत पगडे, पोलीस उपनिरीक्षक दौलत आतकरी, सहायक फौजदार सुभाष खंडागळे, पो.हवा. रवींद्र गोरे, पो. हवा. पवार, पो. हवा. आव्हाड, पो. हवा. मुरूम, पो. ना. मुळसे, पो. ना. कराड, पो. ना. लहांगे , पो. ना. डुबल, पो.ना. कांबळे व सर्व नेमणूक पालघर पोलीस यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
Comments
Post a Comment