राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई : बनावट दारूसह ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त !

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई : बनावट दारूसह ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त !

पालघर : दिनांक १३ जुलै रोजी मुंबई अहमदाबाद महामार्गावर सकवार ता वसई, जिल्हा -पालघर येथे खात्रीलायक बातमी नुसार महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी, सह आयुक्त सुनिल चव्हाण, प्रसाद सुर्वे (अ.व.द), अधीक्षक सुधाकर कदम, उप अधीक्षक बी एन भुतकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघर यांच्या पथकाने सापळा रचत वाहान क्रमांक DN 09 Q 9597 आयशर कंपनीचा टेम्पोची तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला म्हणजेच दादरा नगर हवेली केंद्र शासित प्रदेश येथील विविध प्रकारच्या नामांकित कंपनीच्या ७५० मी ली च्या ७४ बॉक्स, १८० मी ली च्या २४० बॉक्स व बियरचे ५५ बॉक्स असे एकूण किंमत २४,७८,८४० रूपये इतकी असून टेंम्पोची किंमत १८,००,००० रूपये आहे. असा एकूण वाहनासह ४२,७८,८४० कीमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई), ८१,८३ व १०८ नुसार एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई आयुक्त, सहआयुक्त, संचालक, विभागीय आयुक्त, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बा .भ . पाटील यांचे पथकातील दुय्यम निरीक्षक नितीन बा. संखे, जवान नि वाहान चालक अशोक चौधरी, जवान पवार, यशोदा केंगार, निकुंभ यांनी केली तर सदर प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक नितीन बा. संखे करत आहेत.

यावेळी नागरीकांना आवाहन करण्यात येते की, असे बेकायदा परराज्यातील भेसळयुक्त मद्य घेवून येणे कायद्याने गुन्हा आहे व  त्यापासून जनतेच्या आरोग्यास देखील धोका आहे. असे काहीही आढळून आल्यास दूरध्वनी क्रमांक 02525-240422 व ईमेल excisesupdtpalghar@gmail.com व व्हाट्सअप नंबर 8422001133 वर संपर्क साधून माहिती द्यावी.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी