*हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वसई आणि डहाणू येथे गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन !*
*हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वसई आणि डहाणू येथे गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन !*
‘हिंदुराष्ट्र स्थापनेच्या कार्यामध्ये ’गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून सहभागी होऊन गुरुकृपा संपादन करा ! – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन
पालघर : गुरुपौर्णिमा हा गौरवशाली गुरुपरंपरेचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा दिवस असतो यात महान हिंदु संस्कृतीची जोपासना आणि संवर्धन करण्याचे सर्वोच्च कार्य गुरु-शिष्य परंपरेमुळे साध्य झाले. या महान गुरु-शिष्य परंपरेचे स्मरण करण्यासाठी आणि समाजामध्ये हिंदुराष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी प्रेरणा निर्माण करण्याकरिता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यावर्षी *3 जुलै* या दिवशी देशभरात ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पालघर जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वसई आणि डहाणू येथे गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीकृष्ण-अर्जुन, समर्थ-शिवराय, आर्यचाणक्य-चंद्रगुप्त, रामकृष्ण परमहंस-स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या कार्यामुळे धर्मसंस्थापनेचे कार्य होऊन राष्ट्र उद्धाराचेही कार्य झाले. राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना सुव्यवस्था निर्माण करण्याचे महत्कार्य गुरु-शिष्यांनी केल्याचा गौरवशाली इतिहास भारताला लाभला आहे. जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाने शिष्य अर्जुनाला अमूल्य मार्गदर्शन करून धर्मसंस्थापना केली तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासस्वामी यांच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्याच पद्धतीने कलियुगात आपणही गुरूंच्या मार्गदर्शनानुसार प्रयत्न करणे आवश्यक आहे. गुरूंची कृपा संपादन करण्याकरिता गुरूंचे धर्मसंस्थापनेचे म्हणजेच हिंदू राष्ट्र-स्थापनेचे कार्य आपण अंगीकारले पाहिजे. याविषयी सविस्तर विवेचन व्हावे, याकरिता हिंदू जनजागृती समितीच्या वतीने पालघर जिल्हयात 1) विश्वकर्मा सभागृह, वीर सावरकर मार्ग, वसई (प.) 2) एच. के. इराणी सभागृह, स्टेट बँकेजवळ, डहाणू रोड (प) या ठिकाणी सोमवार 3 जुलै 2023 रोजी सायं. 6.00 वा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन) केले जाईल. 'संविधानिक आणि धर्माधिष्ठित 'हिंदू राष्ट्र-स्थापने'चा संकल्प या विषयावर मान्यवर वक्त्यांचे व्याख्यान होणार आहे तसेच समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयीही मान्यवर मार्गदर्शन करतील. या महोत्सवात ‘स्वसंरक्षण प्रात्यक्षिके’ हे विशेष आकर्षण असणार आहे. विविध विषयांवरील आध्यात्मिक, राष्ट्र आणि धार्मिक ग्रंथविषयीचे ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात येणार आहे. तरी सर्व राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चा लाभ करून घ्यावा, तसेच आपले मित्र-परिवार, परिचित, नातेवाईक यांनाही याचे निमंत्रण द्यावे, असे आग्रहाचे आवाहन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment