डहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; एकाला वाचवण्यात यश तर दूसरा बेपत्ता
डहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; एकाला वाचवण्यात यश तर दूसरा बेपत्ता
पालघर : पालघर जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटीला दुर्घटना होऊन बोट बुडाल्याची घटना डहाणूच्या समुद्रात घडली. या बोटीतील दोन तरुणांपैकी एकाला वाचवण्यात यश आलं आहे. तर एक तरुण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे भूपेंद्र अंभिरे असं बेपत्ता तरुणाचं नाव असून त्याच्यासोबत असलेला संजय पाटील हा तरुण समुद्रकिनाऱ्यावर पोहचला आहे सध्या त्या तरुणाचा कोस्टगार्डकडून या शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 1 जून ते 31 जुलै हा 61 दिवसांचा कालावधी मासेमारीसाठी बंदी असताना देखील डहाणूतील दोन तरुण छोटी बोट घेऊन समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. समुद्रात अचानक काही अंतरावर गेल्यावर ही बोट दुर्घटनाग्रस्त झाली. या बोटीवर असलेल्या दोन तरुणांपैकी संजय पाटील हा तरुण समुद्रकिनाऱ्यावर पोहत समुद्रकिनाऱ्यावर पोहचला. तर भूपेंद्र अंभिरे हा तरुण अद्यापही बेपत्ता आहे. सध्या कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरमार्फत त्याचा शोध घेतला जात आहे.
Comments
Post a Comment