परदेशी नागरीकांची अनधिकृत कॉल सेंटर द्वारे फसवणुक करणारी टोळी पालघर पोलीसांनी केली जेलबंद

परदेशी नागरीकांची अनधिकृत कॉल सेंटर द्वारे फसवणुक करणारी टोळी पालघर पोलीसांनी केली जेलबंद

पालघर : दिनांक 13/07/2023 रोजी वाडा पोलीस ठाणे हद्दीतील मेगाविला या रहिवाशी प्रकल्पातील एका इमारतीमध्ये अनधिकृत बोगस कॉल सेंटर चालवीले जात असलेबाबत बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या आधारे शैलेश काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग व सुरेश कदम, पोलीस निरीक्षक, वाडा पोलीस ठाणे यांना पोलीस पथक तयार करुन नमूद ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या.



माहितीच्या आधारे शैलेश काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली  सुरेश कदम, पोलीस निरीक्षक, वाडा पोलीस ठाणे यांनी पोलीस पथक तयार करुन  दिनांक 14/07/2023 रोजी रात्री 12.00 वा सदर इमारतीमध्ये छापा टाकला असता एकूण 6 फ्लैटमध्ये एकूण 23 आरोपी त्यांचे इतर साथीदार हे अनधिकृत कॉल सेंटर चालवीत असताना आढळून आले. याबाबत चौकशी केली असता सदर आरोपी हे आपसात संगणमत करुन लैपटॉप व मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर करुन X-lite, eyebeam, x-ten या एप्सचा वापर करुन कनाडा येथील नागरीकांचा मोबाईल फोन नंबर, नाव व इतर माहिती बेकायदेशिररित्या प्राप्त करून, संबंधिताना आपण अमेज़ॉन ऍपवर ऑर्डर न केलेल्या वस्तु, साहित्य, गिफ्ट्स, किंवा इतर महागड्या वस्तु या ऑर्डर केल्याचे भासवुन, सदरची ऑर्डर कैन्सल करण्यासाठी आपण 1 प्रेस करा असा सल्ला देत असत संबंधितांनी 1 प्रेस केल्यास बोगस कॉल सेंटरला संबंधित व्यक्तीचा फोन कनेक्ट होत असे सदरचा फोन कनेक्ट झाल्यास आरोपीत इसम हे त्यांना लिहून दिलेल्या स्क्रिप्ट नुसार त्या व्यक्तीशी बोलत असत व त्यानुसार संबंधित व्यक्तीकडून माहिती घेऊन संबंधितांनी टाळाटाळ केल्यास तुमचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा रोबोटीक कॉल / व्हाईस कॉल करुन त्यांना घाबरवुन त्यांचेकडून बिटकॉईन वॉलेट मार्फ़त काही रक्कम देण्यास भाग पाडले जात असे. अश्या प्रकारे आरोपीतांनी वरील ऐपचा वापर करुन कनाडा व इतर देशातील नागरीकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक केलेली आहे.

यातील  आरोपीना अटक केलेली असुन त्यांचेविरुद्ध वाडा पोलीस ठाणे येथे गु.र.न 275/2023 भा.द.वि.स कलम 420,419,120(ब), 188, 201, 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा सन 2000 चे कलम 43, 66(डी), 66, 75 सह भारतीय बिनतारी तारायंत्र अधिनियम 1933 चे कलम 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास हा पोनि अनिल विभुते, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली शैलेश काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग, सुरेश कदम, पोलीस निरीक्षक, वाडा पोलीस ठाणे, मसपोनि दिपाली लंभाते, बोईसर पोलीस ठाणे, पोउपनि/ गणेश तारगे, चंद्रकांत हाके, हिम्मतराव सरगर, विजय डाखोरे, मयूरेश अंबाजी, संतोष वाकचौरे, मपोउपनि /पल्लवी बाणे, श्रेणी पोउपनि/ एच.के. जाधव, पोहवा/  गुरुनाथ गोतारणे, मोहन पाटील, विजय मढवी, प्रवीण काळे, मपोहवा/ सुचन पाटील, आशा पाटील, पोना / कृष्णा शेंडे, गणेश पहाड, ज्ञानेश्वर पवार, पोशि / गजानन जाधव, सचिन भोये, चेतन सोनावणे, हरेश काळे, कमळाकर पाटील, भूषण खिल्लारे, सर्व नेमणुक वाडा पोलीस ठाणे, पोशि / रामदास दुर्गेष्ट, क्षत्रिय, राहुल पाटील सर्व नेमणुक सायबर सेल पालघर यांनी केलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी