दाखल घरफोडी गुन्हयाची उकल करण्यात बोईसर पोलीसांना यश : 14 लाखाचा मुद्देमाल जप्त
दाखल घरफोडी गुन्हयाची उकल करण्यात बोईसर पोलीसांना यश : 14 लाखाचा मुद्देमाल जप्त
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर व पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांनी नित्यानंद झा, सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग व उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, बोईसर पोलीस ठाणे यांना तपासाबाबत मार्गदर्शन करुन तपास करण्याच्या सूचना दिल्या त्याप्रमाणे उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, बोईसर पोलीस ठाणे यांनी बोईसर पोलीस ठाणे गुन्हेप्रकटीकरण शाखेचे अधिकारी पोउपनि / विट्ठल मणिकेरी यांचेसह पोलीस पथक तयार केले. सदर पथकाने तांत्रिक कौशल्याच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत आरोपीतांचा माग घेऊन आरोपी क्र 1) स्वप्निल रमेश पाटील (वय 28) 2) स्वप्निल सतीश पाटील (वय 24) दोन्ही रा. गायत्रीनगर दरसमाळ, केळवे रोड ता. जि. पालघर यांना स्वप्निल रमेश पाटील याला बोईसर येथील यशवंत सृष्टी परिसरातून व स्वप्निल सतीश पाटील यास केळवे येथुन ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.तसेच आरोपी यांना अटक करुन त्यांचे कडून वरील वर्णनाचा व किंमतीचा एकूण 14,23,185/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास हा पोउपनि / विट्ठल मणिकेरी, बोईसर पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदरची कामगिरी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, नित्यानंद झा, सहा.पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, बोईसर पोलीस ठाणे, पोउपनि / विट्ठल मणिकेरी, पोहवा / सुरेश दुसाणे, शरद सानप, विजय दुबळा, राहुल पाटील, पोना / योगेश गावीत, रमेश पालवे, पोशि / संतोष वाकचौरे, देवेंद्र पाटील, धिरज साळूखे, मयूर पाटील, मच्छींद्र घुगे, राहुल क्षेत्रीय, सागर जाधव, सर्व नेमणुक बोईसर पोलीस ठाणे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
Comments
Post a Comment