दिव्यराजला शासकीय जागेचा सहारा...
दिव्यराजला शासकीय जागेचा सहारा... दिव्यराजच्या विकासात ग्रामपंचायत व महसूल विभागाचा वाटा - अशोक वडे पालघर : पालघर तालुक्यातील पाम ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शासकीय भूखंडावर तर एका खाजगी भूखंडावरील इमारतीकडे जाण्यासाठी शासकीय जागेचा वापर केल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक तर केली जात नाही ना असा खळबळजनक खुलासा ग्रामस्थांकडून केला जात आहे. मौजे पाम ग्रामपंचायत हद्दीतील स नं १६० हा शासकीय गायरान भूखंड असून ग्रामपंचायत व महसूल विभागाकडून दुर्लक्ष केला जात असल्यामुळे चक्क न्यायालयाचा आधार घेऊन काही बांधकामे निष्कासित करण्यात आले होते तर पुन्हा एकदा याच भूखंडावर अनेक खाजगी इमारतींचे बांधकाम आजही सुरू असून अनेक नागरिक बेधडकपणे या ठिकाणी गुंतवणूक करत आहेत. तसाच एक प्रकार पाम ग्रामपंचायत हद्दीतील एका खासगी भूखंडावर सुरू असलेल्या रहिवास व वाणिज्य वापरातील इमारतीकडे जाणाऱ्या रस्ता बाबत घडलेला असून चक्क शासकीय भूखंडाचा वापर खाजगी जमिनीवर असलेल्या इमारतीकरता केल्या असल्याची तक्रार दाखल करत माजी सरपंच अशोक वडे यांनी ग्रामपंचायत तसेच महसुल विभागावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले...