विराज कंपनीच्या 'धूरखान्यामुळे ' नागरिक त्रस्त

विराज कंपनीच्या 'धूरखान्यामुळे ' नागरिक त्रस्त 


पालघर : बोईसर येथील तारापूर औद्योगिक क्षेत्रात वायु प्रदुषण, कारखान्यात अपघात होऊन कामगारांना गमवावा लागणारा जीव तर कधी अवयव, कारखान्याचा भंगार वाहतूक करताना ट्रक मधून रस्त्यांवर पडणारा टोकदार लोखंडी धातू , ना दुरूस्त अवजड वाहनांमुळे होणारे अपघात, रस्त्यावर दुतर्फा बेशिस्त वाहन पार्किंग मुळे वाहतूक कोंडी समस्या अशा अनेक कारणांमुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील नेहमीच चर्चेत असलेला विराज कारखानावर प्रशासन खूपच मेहरबान दिसतोय. यामध्ये सर्वांत महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रदुषण  याबाबत अनेक तक्रारी करुनही ग्रामस्थांचा विरोध असूनही विराज कंपनीच्या मनमानी कारभाराला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळही सहकार्य करीत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.


तारापूर औद्योगिक क्षेत्रातील विराज कारखान्याचा वायू प्रदुषणाचा फटका आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी लोकांना सर्वाधिक प्रमाणात बसतो. रस्त्यांवर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना प्रवास करताना त्याचा त्रास सहन करावा लागतो . कारखान्यातील प्रदुषित धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्र्वसना सारख्या गंभीर  आजाराना सामोरे जावे लागते. मात्र तरीही कारखान्यात प्रदुषण, अवैध कृत्य होत नसल्याचा कांगावा कारखाना प्रशासनासह संबंधित अधिकारी वर्ग करताना दिसत आहे. ही अत्यंत दुदैवी बाब असून या कारखान्यापासून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी संबधित यंत्रणा मात्र सोयीस्कररित्या कानाडोळा करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. 

छोट्या कारखानदारांनी चूक केल्यास कठोर शिक्षा करणाऱ्या या अधिकारी वर्गाला  नियम धाब्यावर बसवून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विराज कारखाना विरोधात कारवाई करण्यासाठी सवड मिळत नाही की, लाचार यंत्रणेला कागदपत्रे रंगवण्याची लाज वाटत आहे‌ का  ? असा थेट आरोप स्थानिक जनतेतून केला जात आहे तर पर्यावरण विभागाकडून कसेंट देताना अनेक अटी शर्तीच्या आधारे दिली गेलेल्या कसेंटचा पालन करण्यासाठी मोठी खर्चिक बाब असून तो खर्च टाळत थेट हवेत प्रदुषित वायू प्रदुषण करणाऱ्या विराज कारखान्यावर कारवाई भडगा न उचलणाऱ्या पर्यावरण विभागाने रूग्णालयातील डॉक्टरांशी हातमिळवणी करत प्रदुषणामुळे त्रस्त असलेले असंख्य रूग्ण आज रूग्णालयाचा दरवाजा खटखटत आहेत. तर या मुजोर कारखानदाराला वठणीवर आणण्यासाठी लगाम लावणार कोण हा प्रश्न जनतेच्या मनात घर करून बसलेला आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी