दिव्यराजला शासकीय जागेचा सहारा...
दिव्यराजला शासकीय जागेचा सहारा...
दिव्यराजच्या विकासात ग्रामपंचायत व महसूल विभागाचा वाटा - अशोक वडे
पालघर : पालघर तालुक्यातील पाम ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शासकीय भूखंडावर तर एका खाजगी भूखंडावरील इमारतीकडे जाण्यासाठी शासकीय जागेचा वापर केल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक तर केली जात नाही ना असा खळबळजनक खुलासा ग्रामस्थांकडून केला जात आहे.
मौजे पाम ग्रामपंचायत हद्दीतील स नं १६० हा शासकीय गायरान भूखंड असून ग्रामपंचायत व महसूल विभागाकडून दुर्लक्ष केला जात असल्यामुळे चक्क न्यायालयाचा आधार घेऊन काही बांधकामे निष्कासित करण्यात आले होते तर पुन्हा एकदा याच भूखंडावर अनेक खाजगी इमारतींचे बांधकाम आजही सुरू असून अनेक नागरिक बेधडकपणे या ठिकाणी गुंतवणूक करत आहेत.
तसाच एक प्रकार पाम ग्रामपंचायत हद्दीतील एका खासगी भूखंडावर सुरू असलेल्या रहिवास व वाणिज्य वापरातील इमारतीकडे जाणाऱ्या रस्ता बाबत घडलेला असून चक्क शासकीय भूखंडाचा वापर खाजगी जमिनीवर असलेल्या इमारतीकरता केल्या असल्याची तक्रार दाखल करत माजी सरपंच अशोक वडे यांनी ग्रामपंचायत तसेच महसुल विभागावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.
पाम येथील हरिश्चंद्र माणक्या वडे यांची वडिलोपार्जित मालकी स नं १७१ व १८/४/ अ एकूण क्षेत्र ५५०० चौ मीटर या भूखंडावर मे. दिव्यराज प्रॉपर्टीज एल एल पी चे भागिदार विरेंद्र शर्मा व जितेंद्र करानी यांनी एकूण चार इमारतीचे बांधकाम सुरू केलेले असून सन २०१४ साली तशी परवानगी प्राधिकरणाकडून घेण्यात आली आहे. दिव्यराज प्रॉपर्टीज या कंपनीकडून बांधकाम केलेल्या या इमारतीकरता बिनशेती परवानगी आवश्यक असून मुखरस्त्यापासून ४०० मीटर अंतरावर असलेल्या या खाजगी भूखंडाकरता स नं १६०/११३ हा नवीन शर्तीने वाटप केलेला भूखंड खरेदी करून आर सी सी कमानीचे बांधकाम करून रस्ता तयार केलेला असून बिनशेती परवानगी करता ग्रामपंचायत व महसूल विभागाकडून तशी परवानगी देण्यात आलेली आहे.
दरम्यान सदर भूखंड विकसित करताना बिनशेती परवानगी करता पाम ग्रामपंचायतीकडून अटी शर्तीच्या आधारावर ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले असून २० नोव्हेंबर महिन्यात २०१३ रोजीच्या ग्रामसभेत तसा ठराव पारित करण्यात आलेला असून दिनांक ४ मे २०२२ रोजी मंडळ अधिकारी तारापूर यांनी अहवालात नमूद केल्याप्रमाणे सदर आरसीसी कमानीचे बांधकाम हे स नं १६० या शासकीय भूखंडावर असल्याचे प्रथमदर्शनी सांगितले असून पाम ग्रामपंचायतीकडून दिलेला नाहरकत दाखल्यात नमूद अटी शर्तींचा भंग दिव्यराज प्रॉपर्टीज एल एल पी कंपनीकडून करण्यात आलेला असून पाम ग्रामपंचायतीकडून कमानीचे बांधकाम निष्कासित करण्यात येणार आहे का ? तसेच अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी बिनशेती परवानगी करता देण्यात आलेला ना हरकत दाखला रद्द करण्यात येणार आहे का ? बिनशेती परवानगी देताना स्थानिक पातळीवरुन अहवाल सादर करणारे स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी यांना हा शासकीय भूखंड आहे का नाही याचे निरीक्षण करता आले नाही का ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच या खाजगी भूखंडावर दिव्यराज प्रॉपर्टीज एल एल पी कंपनीकडून विकसित करून इमारतीत रहात असलेल्या किमान २०० कुटुंबांचे ये जा करणारा मुख्य मार्गच बंद होण्याच्या मार्गावर असून ग्रामपंचायत, महसूल विभाग व विकासक विरेंद्र शर्मा व जितेंद्र करानी यांनी या कुटुंबांची गौर फसवणूक तर केली नाही ना...
◾दिव्यराज प्रॉपर्टीज एल एल पी कंपनीकडून खाजगी जमिनीवर इमारतीचे बांधकाम केलेले असून त्या इमारतीकडे जाण्यासाठी शासकीय जमीनीचा वापर केला जात असल्याची तक्रार मिळालेली असून वरील कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही केली जाईल : अरविंद संखे - ग्रामसेवक पाम
Comments
Post a Comment