पालघर जिल्हा वंजारी समाज हितवर्धक मंडळातर्फे गुणवंत्ताचा सत्कार
पालघर जिल्हा वंजारी समाज हितवर्धक मंडळातर्फे गुणवंत्ताचा सत्कार
पालघर : पालघर जिल्हा वंजारी समाज हितवर्धक मंडळाच्या विद्यमाने सन २०२२-२३ व २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच विशेष प्राविण्य प्राप्त गुणीजनांचा गुणगौरव व सत्कार बुधवार दि. २८ डिसेंबर रोजी बोईसर येथील स्व. किशोर गंगाधर संखे व स्व. मोरेश्वर वामन पाटील खुले सभागृह, अमेय पार्क, नवापुर रोड, बोईसर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाची सुरुवात पाम कुंभवली विभाग हायस्कूलच्या शिस्तबद्ध बँड व संचलन पथकाने केले पाम कुंभवली विभाग हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी मान्यवरासमोर सुंदर व सुमधुर आवाजात ईशस्तवन व स्वागत गीत सादर करण्यात आले. त्यानंतर आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ मेघा रोशन पाटील, प्रमुख पाहूणे सुधाकर भा. संखे, व विशेष अतिथी क्षितिज उदय संखे यांनी घेतलेले शिक्षण व त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरी माहिती सांगून कौतुक करण्यात आले. त्यानंतर समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच विशेष प्राविण्य प्राप्त गुणीजनांचा गुणगौरव व सत्कार कार्यक्रमाला सुरावात करण्यात आली.
प्रथमतः दहावी बारावी प्रथम ,द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थी तदनंतर पदवी पदविका पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी व सरते शेवटी इयत्ता बारावी व इयत्ता दहावी यामध्ये विशेष यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा यथोचित स्वागत व सत्कार सोहळा मंचावरील स्थानापन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, विशेष अतिथी तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी विभागीय सचिव यांच्यामार्फत संपन्न करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. मेघा रोशन पाटील (M.A., B.ED. मुंबई) प्राचार्य के. डी. व एम. के. ज्यु. कॉलेज चिंचणी व प्रमुख पाहूणे सुधाकर भा. संखे (DIR. SANKHE GROUP OF COMPANY, VIRAR) व विशेष अतिथी क्षितिज उदय संखे (B.TECH. IIT मुंबई, MBA, IIM आणि सोबतच इतर सर्व वंजारी समाज हितवर्धक मंडळाचे सदस्य पदाधिकारी व विभागीय उपाध्यक्ष याच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन पाम हायस्कूलचे सचिन वेस्ता संखे यांनी केले व सरतेशेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment