डहाणूत पत्रकरास मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याने सदस्य व ग्रामस्थांवर गुन्हा दाखल
डहाणूत पत्रकरास मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याने सदस्य व ग्रामस्थांवर गुन्हा दाखल
डहाणू : पालघर जिल्ह्यांतील डहाणू तालुक्यातील आशागड ग्रामपंचायतीत पत्रकाराला मारहाण करून जातीयवादी शिवीगाळ केल्याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध व नागरि हक्क संरक्षण कायद्यानुसार दोन सदस्य व एका ग्रामस्थावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव संदिप रणदिवे अशा या पत्रकाराचे नाव असून दैनिक झुंझार केसरी या वृत्तपत्रातून वृत्तांकन करण्याचे काम करत असताना दिनांक २० डिसेंबर रोजी आशागड ग्रामपंचायतीत ग्रामसभा सुरू असताना सदर ग्रामपंचायतीचा ग्रामस्थ म्हणून उपस्थित वैभव यांनी सदर ग्रामसभेत ग्रामसेविका अश्विनी तांडेल यांच्याकडून कामाचा तपशील मांडत असताना मोबाईल कॅमेऱ्यात चित्रिकरण करणाऱ्या पत्रकार वैभव रणदिवे यास सदस्य कन्हैया उत्तम पवार, सदस्य दिपक मोहिते व ग्रामस्थ ललित उत्तम पवार यांनी वैभव यास पकडून धक्काबुक्की करत चित्रिकरण का करतोस तसेच तू या गावात रहात नाही तूजे इकडे काय काम अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जातियवादी शिवीगाळ देऊन मारहाण केल्याची घटना घडलेली असून कन्हैया उत्तम पवार, दिपक मोहिते व ललित उत्तम पवार यांच्या विरोधात डहाणू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५), व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम नुसार ३(१)(r), ३(१)(s) तर नागरि हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम नुसार ७(१)(d) गुन्हा दाखल करण्यात आलेला असून डहाणू पोलिसांकडून सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
Comments
Post a Comment