बोईसर तारापूर रस्त्यावरील जाहिरात होडिंग नागरिकांसाठी धोकादायक
बोईसर तारापूर रस्त्यावरील जाहिरात होडिंग नागरिकांसाठी धोकादायक
बोईसर : बोईसर वरून तारापूरकडे जाणाऱ्या एमआयडीसी नाका व तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या कर्मचारी वसाहतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लोखंडी स्ट्रक्चर उभे केले आहे. या जाहिरातीसाठी दिलेल्या ठेकेदाराकडून शहरात बसवलेले होर्डिंग नागरिकांसाठी धोकादायक बनले आहेत.
बोईसर शहरात अनधिकृत बांधकामे आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यात अद्याप यश आलेले नाही. शहरात विविध ठिकाणी उभे केलेले होर्डिंग धोकादायक असून देखील संबधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. राज्यात होर्डिंग्ज कोसळून अनेक अपघात आजपर्यंत झालेले असतानाही भर गर्दीच्या ठिकाणी बसवलेल्या भल्या मोठ्या होर्डिंगकडे दुर्लक्ष केले जात आहे.
तारापूर अणुऊर्जा केंद्र, भाभा अणू संशोधन केंद्र तसेच
बोईसर - तारापूरकडे जाणाऱ्या एमआयडीसी नाका व तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या कर्मचारी वसाहतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जाहिरात फलक लावण्यासाठी लोखंडी स्ट्रक्चर उभे केले आहे या रस्त्यावर अहोरात्र प्रचंड अवजड व प्रवासी वाहतूक होत असते. रस्त्यावर जाहिरात फलक लावण्यासाठी ठेकेदार कंपनीने लोखंडी स्ट्रक्चर मुख्य रस्त्यापासून अवघ्या आठ ते दहा फुटांवर उभारले आहेत. त्या स्ट्रक्चरवर जाहिरात लावण्यासाठी जे लोखंडी अँगल आहेत, त्याचा बराचसा भाग रस्त्यापर्यंत आल्याने तारापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी असणाऱ्या आपत्कालीन मार्गाला याचा अडथळा उद्भवू शकतो. तसेच कमानीच्या बाजूनेच उच्च दाबाची विद्युत प्रवाह सुरू असलेली वाहिनी गेलेली असून अशावेळी त्या ठिकाणी मोठी दुर्घटना होऊ शकते.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात फलक लावण्याचा ठेका हा हर्ष इंटरप्राईजेसला देण्यात आला आहे. या कंपनीने तारापूर औद्योगिक क्षेत्र नाका व टॅप्स गेटदरम्यान २० मीटर रुंद व २० मीटर उंच असणारे फलक बसवण्यासाठी लोखंडी कमान उभारण्याचे काम हाती घेतले आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मुख्य रस्त्यापासून विशिष्ट अंतर सोडणे अनिवार्य असताना या लोखंडी कमानीचा पाया मुख्यरस्त्यापासून काही अंतरावरच आहे, तर या लोखंडी कमानी उभारलेली जागा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येत असून लोखंडी कमान उभारण्याची परवानगी औ वि म उपअभियंता बोईसर तारापूर यांच्याकडून देण्यात आलेली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या या मार्गालगत बेकायदेशीर धोकादायक लोखंडी कमान उभारत असताना शाखा अभियंता कल्पेश पाटील व उपविभागीय अभियंता हेमंत भोईर बघ्याची भूमिका घेत असल्याचे नागरिकांकडून बोललं जात आहे.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या मार्गालगत दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या जाहिरात कमानी धोकादायक ठरत असून ते निष्कासित करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत व उपविभागीय पोलिस अधिकारी बोईसर यांच्याकडून वारंवार लेखी कळवून देखील हे धोकादायक कमानी निष्कासित करण्यासाठी वेळकाढूपणा करणारे शाखा अभियंता कल्पेश पाटील व उपविभागीय अभियंता हेमंत भोईर या कमानी ठेकेदारासोबत साटे - लोटे तर करत नाही ना...
◾ दुरध्वनी द्वारे संपर्क साधला असता कुठलाही प्रत्युत्तर उपविभागीय अभियंता हेमंत भोईर यांनी दिला नाही.
◾एम आय डी सी नाका व टॅप्स गेट येथे लोखंडी कमान उभारण्यासाठी हर्ष इंटरप्राईजेस यांनी ना हरकत दाखला मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता परंतु शासन निर्णय २६/११/२०२४ च्या परिपत्रकानुसार जाहिरात फलक व कमान उभारण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला नाही :- मयुर पाटील - ग्रामसेवक पास्थळ
Comments
Post a Comment